Author: crime aala

डोंबिवली (प्रतिनिधी): लोढाहेवन-निळजे येथे वैशाखी पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमा महोत्सवानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्धांचा २०८८ वा जयंती महोत्सव-२०२६ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा महोत्सव बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.७११, पंचशील सामाजिक संस्था (रजि.) आणि पंचशील महिला मंडळ, लोढाहेवन-निळजे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यंदा बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी आल्याने कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले. सकाळी १० वाजता बुद्धवंदना करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर “सुखी करणारा बुद्ध” या विषयावर अर्चनाताई मोहिते (प्राचार्या, निवेदिका) यांनी धम्म प्रबोधनपर प्रवचन देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थितांसाठी खिरदान व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. सायंकाळी महिलांसाठी मनोरंजनात्मक…

Read More

डोंबिवली:डोंबिवली जवळील घारीवली परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित गुन्ह्याने हादरला असून, 10 ते 15 जणांच्या टोळक्याने एका वृद्धाची लोखंडी रॉडने बेदम हत्या केल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे “डोंबिवलीत गुंड मोकाट आणि पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल जाधव यांचे भाऊ दिनेश जाधव यांना काही तरुणांनी फोन करून बोलावले. ते घटनास्थळी पोहोचताच 10 ते 15 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. हा वाद मिटवण्यासाठी मध्ये पडलेल्या बामा जाधव यांनाही आरोपींनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत जागीच ठार केले. मृत व्यक्तीचे नाव बामा जाधव असून ते वंचित…

Read More

डोंबिवली : डोंबिवली शहरातील अपुऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांचा फायदा घेत काही लक्झरी बस चालक-मालक, ट्रॅव्हल्स ऑपरेटर, रेडीमिक्स मिक्सर,रेती वाहतूक करणारे ट्रक-डंपर तसेच इतर खाजगी बस चालकांकडून प्रवेशबंदीच्या वेळेतही शहरात सर्रास वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. अरुंद रस्ते असलेल्या डोंबिवली शहरात ही वाहने पिक-अप, ड्रॉप तसेच मार्गक्रमण करत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होत आहे. डोंबिवलीच्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक शाखेचे कर्मचारी अत्यल्प प्रमाणात असून ट्रॅफिक वॉर्डनवरच बहुतांश जबाबदारी असल्याने शहरातील वाहतूक नियमन व संचालन प्रभावीपणे होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांनी सांगितले की, योग्य वेळी लक्झरी बसचे अनधिकृत पिकअप पॉइंट बंद न केल्यास आणि प्रवेशबंदीच्या वेळेत जड-अवजड वाहनांना रोखले नाही,…

Read More

डोंबिवली : देविचापाडा येथील खाडीकाठी झालेल्या निर्घृण खून प्रकरणातील तब्बल अडीच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी नाट्यमय कारवाई करत नांदेड जिल्ह्यातून अटक केली आहे. पोलिसांना सतत ठिकाणे बदलून गुंगारा देणारा आरोपी अखेर वेशांतर करून रचलेल्या सापळ्यात अडकला. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी देविचापाडा, स्मशानभूमीमागील खाडीकाठ परिसरात एका अनोळखी इसमाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला होता. तपासाअंती मृताची ओळख सोमनाथ बाबू शिंदे अशी पटली. किरकोळ वादातून दगडाने डोक्यात मारहाण करून त्याची हत्या केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात यापूर्वी दोन आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र मुख्य साथीदार दिपक साहेबराव करकडे हा गुन्ह्यानंतर फरार होऊन विविध ठिकाणी वास्तव्य बदलत…

Read More

डोंबिवली : डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून इंदिरा चौक परिसरात अक्षरशः अराजक माजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चौकाच्या चारही बाजूंनी रिक्षाचालक बेकायदेशीरपणे ५ ते ६ प्रवासी भरून रस्त्यातच थांबत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, नागरिकांना रस्ता मिळणे कठीण झाले असून वारंवार वादविवाद, बाचाबाची आणि दादागिरीचे प्रकार वाढत असल्याची तक्रार आहे. याच ठिकाणी काळी-पिवळी टॅक्सी चालक देखील नियम धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. एका टॅक्सीत ८ ते १० प्रवासी कोंबून जीव धोक्यात घालण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अनेक वाहनांकडे वैध परवाने व कागदपत्रे नसतानाही ही वाहतूक खुलेआम…

Read More

डोंबिवली (प्रतिनिधी) : बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र ७११,पंचशील सामाजिक संस्था व पंचशील महिला मंडळ,लोढाहेवन निळजे यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रवती अशोक सम्राट,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव २०२६ या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १४ एप्रिल ते १६ एप्रिल या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमासह भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी लोढाहेवन,निळजे या शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आणि नातू माननीय आनंदराज आंबेडकर हे पाहिल्यादाच आल्याने आंबेडकरी समाजात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण दिसुन आले शिवाय तिन्ही संघटनेच्या वतीने आनंदराज आंबेडकर यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. “आनंदराज आंबेडकरच आंबेडकरी समाजाला योग्य दिशा देऊ शकतात…

Read More

कल्याण :कल्याण–मुरबाड मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातासाठी संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. छाया टॉकीज, कल्याण ते मुरबाड या मार्गावर मोठ्या प्रमाणात “काळी-पिवळी” टॅक्सी तसेच खाजगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक, १५ ते २० प्रवासी वाहतूक केली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. महात्मा फुले चौक परिसरात, वाहतूक पोलीस कार्यालयाजवळच या वाहनांचे उघड थांबे सुरू असल्याने RTO व वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये…

Read More

कल्याण :वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत आरोपीला अटक केली असून तब्बल ३ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या १० मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस उप आयुक्त परि. ०३ कल्याण अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. दिनांक ०३ एप्रिल २०२६ रोजी पोशि/१५२६ सुरेंद्र इंगळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर रॉयल रेसिडेन्सी परिसरात दोन इसम संशयास्पद हालचाली करत असून उभ्या असलेल्या…

Read More

डोंबिवली :विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील मानकोली ब्रिज परिसरात धोकादायक स्टंटबाजी करून सोशल मीडियावर रील पोस्ट करणाऱ्या तिघा तरुणांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. ही कारवाई ७ एप्रिल २०२६ रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने करण्यात आली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश राजू फोंडा रेड्डी (वय २२, रा. राम मंदिर, डोंबिवली पश्चिम), कबीर मच्छिंद्र नेतकर (वय २२, रा. टेल्कोसवाडी, कोपर रोड, डोंबिवली पश्चिम) आणि यश नितेश मालवणकर (वय २३, रा. सायली निवास बिल्डिंग, डोंबिवली पश्चिम) यांनी होंडा अ‍ॅक्टिवा (क्र. MH 05 EU 8768) या दुचाकीवर ट्रिपल सीट बसून मानकोली ब्रिजवर धोकादायक पद्धतीने वाहन चालवत स्टंट केले. या प्रकाराचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.ही…

Read More

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पेंढारकर कॉलेज परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली,होती मात्र या कारवाईत फक्त काही मोजक्या हातगाडी व फेरीवाल्यांवरच कारवाई करण्यात आली. याच ठिकाणी फूटपाथवर उघडपणे “ चहा” आणि मोमोचे स्टॉल सुरू असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “फूटपाथ हा चालण्यासाठी की व्यवसायासाठी?” असा थेट सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काही ठराविक स्टॉलधारकांना जाणीवपूर्वक वगळले जात आहे. “यांना वेगळं लायसन्स आहे का? की यांच्यासाठी वेगळाच कायदा आहे?” असा सवाल उपस्थित होत असून, या मागे ‘चिरिमिरी’चा प्रकार तर नाही ना, अशीही…

Read More