Author: crime aala
डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा वेगाने तपास करत सराईत वाहनचोराला अटक करून तब्बल २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल CR No. 136/26 या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी आदर्श रोहिदास बागडे (वय २५), रा. कुंभार खानपाडा, डोंबिवली (पश्चिम) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून या गुन्ह्यात चोरीस गेलेली रिक्षा जप्त करण्यात आली. पुढील सखोल तपासात आरोपीने इतर वाहनचोरीचे गुन्हेही केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून अंबरनाथ पोलीस ठाणे CR No. 199/26 मधील चोरीस गेलेली स्कुटी तसेच सेंट्रल पोलीस ठाणे CR No. 268/26 मधील चोरीची रिक्षा देखील हस्तगत करण्यात आली.…
कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त
कल्याण:कल्याण पूर्व येथील लोकग्राम परिसरात मुसळधार पावसादरम्यान एक मोठे झाड अचानक वाहनांवर कोसळल्याने अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांचा फरक पडला असता मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी धोकादायक व जीर्ण झाडांची पाहणी करून त्यांची छाटणी किंवा हटविण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची असतानाही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.”आज वाहनांचे…
डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाले व गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकार (RTI) अर्जाचा आधार घेत तब्बल १५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांच्या मुसक्या गुन्हे शाखा, घटक-०३, कल्याण यांनी आवळल्या. पेंढारकर कॉलेजजवळील बर्गर शॉपमध्ये खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपींना रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे दिपेश गौतम लोखंडे (३९), राहुल सुधाकर मुकादम (३०), विशाल गंगाराम जानकर (३१) आणि नरेश राजेंद्र सूर्यवंशी (२९) अशी आहेत. हे आरोपी MH-43-CM-0262 व MH-04-MN-7691 या वाहनांतून घटनास्थळी आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. अजवानी-मेटकॉन जॉईंट व्हेन्चर या कंपनीने एमआयडीसीतील नाले व गटाराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे…
कल्याण : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढत्या घरफोडी चोरीच्या घटनांचा छडा लावत गुन्हे शाखा, घटक-3 कल्याणच्या पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. सराईत घरफोड्या चोरटा राजेश अरविंद राजभर (वय 30) याला उत्तर प्रदेशातील आजमगढ येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून व त्याच्या साथीदारांकडून 38 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पालघर व ठाणे ग्रामीण परिसरातील 21 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. चौकशीत आरोपीने अनेक घरफोड्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याची पहिली…
कल्याण : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कल्याण पश्चिम येथील वासुदेव बळवंत फडके मैदान येथे गुरुवारी (दि. 25) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पार पडली. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) संजय जाधव यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या सरावात पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्यासह परिमंडळ 3 मधील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. या रंगीत तालीमेत 22 पोलीस अधिकारी, 92 पोलीस अंमलदार, एसआरपीएफ प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, सीआरएम मोबाईल, अग्निशमन दलाचे वाहन, रुग्णवाहिका तसेच अन्य यंत्रणांचा सहभाग होता. संभाव्य दंगली, जमाव नियंत्रण व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ…
डोंबिवली:डोंबिवलीतील 90 फूट रोडवरील 90 फीट चहा वालासमोरील बाजूस असलेला विद्युत ट्रान्सफॉर्मर अचानक कोसळल्याने एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ट्रान्सफॉर्मर थेट एका दुचाकीवर कोसळल्याने दुचाकीस्वार व त्यांच्यासोबत असलेली मुलगी नशिबाने बचावल्याने संभाव्य जीवितहानी टळली यात गाडीचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप चौधरी, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील, केडीएमसीचे वॉर्ड अधिकारी ठाकूर तसेच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी प्रदीप चौधरी यांनी महावितरणच्या गलथान कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. महावितरणने तातडीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले. मात्र केडीएमसीचे वॉर्ड…
डोंबिवली:बदलापूर पाईपलाईन रोड परिसरात आज टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून टेम्पो व रोड साईडला उभ्या असलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समोरील मोठ्या वाहनाने अर्जंट ब्रेक मारल्याने टेम्पोचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चालकाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.
डोंबिवली: शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत डोंबिवली शहरात वाहतूक विभागाकडून अनेक स्कूल बसची अचानक तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण २७ स्कूल बसची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान बस चालकांचा परवाना, वाहनांची आवश्यक कागदपत्रे, बसमध्ये महिला अटेंडंटची उपलब्धता, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यस्थिती तसेच चालक मद्य अथवा अन्य नशेच्या प्रभावाखाली वाहन चालवत नाही ना याची सखोल पडताळणी करण्यात आली. या तपासणीत विविध नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने ९ स्कूल बसवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तसेच सर्व स्कूल बस चालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, यापुढेही अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा…
दिवा:दिवा शहरातील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अवघ्या १२ वर्षांच्या देवेंद्र आशिष सिंग या निष्पाप बालकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली सुरू असलेल्या बोगस डॉक्टरांच्या जीवघेण्या धंद्यामुळे आणखी एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाल्याचा आरोप होत आहे. माहितीनुसार, देवेंद्र याला दिवा परिसरात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे एका कथित “बंगाली डॉक्टर” कडून औषध देण्यात आल्यानंतर काही मिनिटांतच मुलाची प्रकृती गंभीर झाली. हात-पाय वाकडे होणे, बेशुद्ध पडणे अशी धक्कादायक लक्षणे दिसल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोंबिवलीहून मुंबईतील केईएम रुग्णालयात हलविण्यात आलेल्या देवेंद्रने तब्बल सात दिवस मृत्यूशी झुंज दिली; मात्र अखेर १…
कल्याण: एकीकडे तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचून नागरिक अक्षरशः उकाड्याने हैराण झाले असताना, दुसरीकडे कल्याण पूर्वेतील द्वारली पाडा, भाल, माणेरे आणि वसार परिसरात वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. सततच्या वीज खंडिततेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणावर तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर शेतकरी वर्गालाही या समस्येचा फटका बसत असून दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य युवराज ज्ञानदेव कांबळे…
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.