
डोंबिवली:बदलापूर पाईपलाईन रोड परिसरात आज टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला असून टेम्पो व रोड साईडला उभ्या असलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समोरील मोठ्या वाहनाने अर्जंट ब्रेक मारल्याने टेम्पोचा ताबा सुटला आणि हा अपघात घडला. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व वाहतूक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
चालकाची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.