
कल्याण : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कल्याण पश्चिम येथील वासुदेव बळवंत फडके मैदान येथे गुरुवारी (दि. 25) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम पार पडली.
अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) संजय जाधव यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या सरावात पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्यासह परिमंडळ 3 मधील विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले.
या रंगीत तालीमेत 22 पोलीस अधिकारी, 92 पोलीस अंमलदार, एसआरपीएफ प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स, सीआरएम मोबाईल, अग्निशमन दलाचे वाहन, रुग्णवाहिका तसेच अन्य यंत्रणांचा सहभाग होता. संभाव्य दंगली, जमाव नियंत्रण व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी पोलिसांची सज्जता तपासण्यात आली.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कल्याण पोलिसांची सज्जता; दंगा काबू योजनेच्या रंगीत तालमीद्वारे ताकदीचे प्रदर्शन करण्यात आले.