Close Menu
    What's Hot

    सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी

    कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त

    RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    डोंबिवली वाहतूक शाखेच्या आशीर्वादाने ओव्हरसीट टॅक्सी सुसाट.

    crime aalaBy crime aalaApril 22, 2026Updated:April 22, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    डोंबिवली : डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असून इंदिरा चौक परिसरात अक्षरशः अराजक माजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चौकाच्या चारही बाजूंनी रिक्षाचालक बेकायदेशीरपणे ५ ते ६ प्रवासी भरून रस्त्यातच थांबत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, नागरिकांना रस्ता मिळणे कठीण झाले असून वारंवार वादविवाद, बाचाबाची आणि दादागिरीचे प्रकार वाढत असल्याची तक्रार आहे.

    याच ठिकाणी काळी-पिवळी टॅक्सी चालक देखील नियम धाब्यावर बसवून अवैध प्रवासी वाहतूक करत असल्याचे समोर आले आहे. एका टॅक्सीत ८ ते १० प्रवासी कोंबून जीव धोक्यात घालण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अनेक वाहनांकडे वैध परवाने व कागदपत्रे नसतानाही ही वाहतूक खुलेआम सुरू असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    काही दिवसांपूर्वी कल्याणजवळ रायता पुलावर झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तरीही प्रशासनाने धडा न घेतल्याने डोंबिवलीत आजही अवैध वाहतूक जोमात सुरू असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकारांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

    दरम्यान, क्राईम आळा प्रतिनिधी  यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहतूक शाखेतील भ्रष्टाचाराबाबत कोणाकडे ठोस माहिती असल्यास पुढे यावे. संबंधितांची ओळख गुप्त ठेवून पुराव्यांची पडताळणी करून हा मुद्दा माध्यमांद्वारे उचलला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

    डोंबिवलीतील वाढत्या वाहतूक अराजकामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून प्रशासनाने तातडीने कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

    dombivali
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleलोढा हेवनमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा जोरदार स्वागत सोहळा
    Next Article अडीच वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा खुनातील फरार आरोपी अखेर जेरबंद!
    crime aala

    Related Posts

    सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी

    July 4, 2026

    कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त

    July 4, 2026

    RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद

    July 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी

    कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त

    RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद

    उत्तर प्रदेशातून सराईत चोरटा जेरबंद;  38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.