
कल्याण :कल्याण–मुरबाड मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातासाठी संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
छाया टॉकीज, कल्याण ते मुरबाड या मार्गावर मोठ्या प्रमाणात “काळी-पिवळी” टॅक्सी तसेच खाजगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक, १५ ते २० प्रवासी वाहतूक केली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
महात्मा फुले चौक परिसरात, वाहतूक पोलीस कार्यालयाजवळच या वाहनांचे उघड थांबे सुरू असल्याने RTO व वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी बेकायदेशीर वाहतुकीला संरक्षण मिळत असल्याचीही चर्चा आहे. वेळेत कारवाई झाली असती, तर अपघात टाळता आला असता, असेही मत व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणी बेकायदेशीर वाहतूक तात्काळ बंद करण्याची, संबंधित वाहनांवर कारवाई करण्याची तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती शिस्तभंग कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या मार्गावर नियमित तपासणी मोहीम राबवण्याची मागणी
या वेळी वल्ली राजन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी केली