
डोंबिवली : शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, डॉक्टर आणि नर्स यांच्याशी कथित मारहाणीच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केल्याची पुष्टी परिमंडळ-३ चे डीसीपी अतुल झेंडे यांनी केली आहे.
या घटनेनंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला असून, या प्रकरणातील इतर आरोपींची भूमिकाही तपासली जात आहे. अटकेनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, संपूर्ण प्रकरणाकडे कल्याणसह ठाणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.