Author: crime aala
डोंबिवली :डोंबिवली परिसरात पोलीस स्टेशनच्या अगदी जवळपास ऑनलाईन लॉटरीचा बेकायदेशीर व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी व अर्ज करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खुलेआम सुरू असलेल्या या लॉटरी अड्ड्यांमुळे तरुण वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक नुकसानाच्या जाळ्यात अडकत आहेत. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच हा व्यवसाय चालू असताना पोलिसांना याची माहिती नाही का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने “पोलिसांचा धाक राहिला नाही” अशी भावना परिसरात पसरली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने…
कल्याण (प्रतिनिधी ): कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना मानपाडा पोलिसांनी मोठी कामगिरी करत सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला उल्हासनगर येथून अटक केली आहे. या आरोपीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी . मोमीन उमर शेख (वय ५९, व्यवसाय – हॉटेल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आपले हॉटेल बंद करून घरी गेल्यानंतर २१ मार्च ते २२ मार्च २०२६ दरम्यान रात्री अज्ञात आरोपींनी हॉटेलचे शटर वाकवून लॉकरमधील रोख रक्कम व दोन मोबाईल फोन चोरी केले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५, ३३१(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला…
डोंबिवली : कल्याण गुन्हे शाखा युनिट-३ ने केलेल्या धडक कारवाईत अवैध अग्निशस्त्रांचा मोठा साठा व लाखोंच्या बनावट नोटा जप्त करत एका सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-३ कल्याणकडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असताना सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार डोंबिवली पूर्व येथील दावडी परिसरात राहणारा सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५) हा अवैध शस्त्रसाठा बाळगून असल्याची खात्री पटली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपीस ताब्यात…
कल्याण (प्रतिनिधी):कल्याण शहरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी गंभीर बनल्या असून याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सचिव वल्ली राजन यांनी तहसीलदार कार्यालय, कल्याण येथे निवेदनाद्वारे केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्राहकांनी बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही ठिकाणी काळाबाजार, जादा पैसे आकारणी आणि जाणीवपूर्वक विलंब केल्याच्या घटनाही समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गॅस एजन्सींनी सामाजिक जबाबदारी पार पाडत ग्राहकांना योग्य सेवा द्यावी, असे आवाहन वल्ली राजन यांनी केले. बुकिंगनुसार वेळेत गॅस…
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे ठाणे पोलिसांच्या स्मार्ट, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरांवरील विविध शासकीय कार्यालयांचे दोन टप्प्यांत मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) अशा एकूण सात महत्त्वाच्या घटकांचा समावेश होता. राज्यातील १२ पोलीस आयुक्तालयांमध्ये झालेल्या या स्पर्धात्मक मूल्यमापनात ठाणे पोलीस आयुक्तालयाने उत्कृष्ट समन्वय, नवकल्पना आणि प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर द्वितीय स्थान मिळवले.या…
कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून “क” प्रभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कामकाजावर आता थेट प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पथकाची गाडी तासन्तास एकाच ठिकाणी उभी असते, मात्र त्याच गाडीच्या आजूबाजूला फेरीवाले निर्धास्तपणे व्यवसाय करताना दिसत आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून “कारवाईच्या नावाखाली फक्त दिखावा सुरू आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक वेळा “आपले सरकार” पोर्टलवर तक्रारी करूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. कागदोपत्री कारवाई दाखवली जाते, पण जमिनीवर परिस्थिती तशीच असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.यामुळे स्टेशन परिसरात पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ता उरलेलाच नाही. महिलांपासून…
डोंबिवली (प्रतिनिधी) : श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी मानपाडा पोलीस ठाण्याच्या वतीने दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. हा रूट मार्च लोढा जंक्शन येथून सायंकाळी ७:०० वाजता सुरू झाला. पुढे काळूबाई चौक, भवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, निळजे स्टेशन, कासारिओ पलावा मार्गे गणेश घाट, लोढा हेवन येथे सायंकाळी ८:१० वाजता समारोप झाला. या रूट मार्चमध्ये डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ७ पोलीस अधिकारी, ३५ पोलीस अंमलदार, पीटर मोबाईल, सीआरएम मोबाईल तसेच बिट मार्शल यांचा सहभाग होता. पोलीस दलाच्या…
बदलापूर (प्रतिनिधी) : “पेट्रोल संपणार” या अफवेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून अंबरनाथ व बदलापूर परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. सोशल मीडियावर वेगाने पसरलेल्या या अफवेवर विश्वास ठेवत अनेक नागरिकांनी घाईघाईने पेट्रोल भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली. परिणामी, काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली तर काही पंपांवर तात्पुरती गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, अधिकृत सूत्रांकडून कोणतीही पेट्रोल टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तेल कंपन्यांकडून पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी शांतता राखून अनावश्यक गर्दी टाळावी, तसेच केवळ आवश्यक तेवढेच…
डोंबिवली (प्रतिनिधी) : लोढाहेवन निळजे येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क. ७११ पंचशिल सामाजिक संस्था (रजि.)पंचशिल महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नाईट अंडर-आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा अर्थात….”संविधान चषक -२०२६” या स्पर्धेचे २१ व २२ मार्च,२०२६ रोजी,आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटक व प्रमुख अतिथी राजेशजी मोरे (आमदार,कल्याण ग्रामीण),अतुलजी झेंडे सर (पोलीस उपायुक्त,परिमंडळ ३,कल्याण),ऍड हर्षाली विजय चौधरी- थविल (महापौर,कल्याण डोंबिवली मनपा.),राहुल दामले (उपमहापौर,कल्याण डोंबिवली मनपा.) राजूदादा पाटील (माजी आमदार),विनोद रतन पाटील (अध्यक्ष -क्रिकेट असोसिएशन,कल्याण ग्रामीण),गजानन मोतीराम पाटील (नगरसेवक,प्रभाग क्रमांक ३१),सौ शैलेजा लालचंद भोईर (नगरसेविका प्रभाग क्रमांक ३१) यांना आमंत्रित करण्यात आले होते. संविधान चषक २०२६ या स्पर्धेसाठी खासकरून आमदार राजेशजी…
डोंबिवली : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘कर्तव्य जननी सन्मान सोहळा’ डोंबिवलीतील आनंद भवन येथे मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. शिक्षण, कायदा, सामाजिक कार्य, साहित्य, गृहिणी, नगरसेविका, बस वाहक, सफाई कर्मचारी, पोलीस अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल (कल्याण-डोंबिवली महानगरपालिका) तसेच ॲड. प्रकाश जगताप (अध्यक्ष, कल्याण फौजदारी वकील संघटना) उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र न्यूजच्या संपादिका अमृता पाटणकर यांचीही प्रमुख…
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.