Close Menu
    What's Hot

    सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी

    कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त

    RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    उल्हासनगरातून घरफोडी करणारा सराईत चोर जेरबंद; मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई

    crime aalaBy crime aalaApril 2, 2026Updated:April 2, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    कल्याण (प्रतिनिधी ): कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना मानपाडा पोलिसांनी मोठी कामगिरी करत सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला उल्हासनगर येथून अटक केली आहे. या आरोपीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    फिर्यादी . मोमीन उमर शेख (वय ५९, व्यवसाय – हॉटेल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आपले हॉटेल बंद करून घरी गेल्यानंतर २१ मार्च ते २२ मार्च २०२६ दरम्यान रात्री अज्ञात आरोपींनी हॉटेलचे शटर वाकवून लॉकरमधील रोख रक्कम व दोन मोबाईल फोन चोरी केले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५, ३३१(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ ते उल्हासनगर येथील राहुलनगरपर्यंत तब्बल ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे २९ मार्च २०२६ रोजी चक्कीनाका परिसरात सापळा रचून आरोपी अनिल संजु रूपवते (वय २० वर्षे) याला अटक करण्यात आली.

    तपासादरम्यान आरोपीने आपल्या साथीदार संजु किसन वाघरी याच्यासोबत घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत आरोपीने कल्याण, डोंबिवली व अंबरनाथ परिसरातील एकूण ७ घरफोडीचे गुन्हे केल्याचेही उघड झाले आहे.

    पोलिसांनी आरोपीकडून सुमारे २,०८,००० रुपये किंमतीचे १२ मोबाईल फोन, एक पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा दुचाकी व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीस ०२ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

    उघडकीस आलेले गुन्हे:
    मानपाडा, महात्मा फुले चौक, हिललाईन, कोळशेवाडी, टिळकनगर व डोंबिवली पोलीस ठाण्यातील एकूण ७ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे.

    सदरची कामगिरी  संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण,  अतुल झेंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व  सुहास हेमाडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली  संदिपान शिंदे वपोनि, मानपाडा पोलीस ठाणे यांच्या देखरेखीखाली  जयपालसिंह रजपुत पोनि (गुन्हे), सपोनि. सागर चव्हाण, सपोउपनिरी. सुनिल पवार, पोहवा / सुशांत पाटील, पोहवा./संजु मासाळ, पोहवा./विकास माळी, पोहवा./शिरीष पाटील, पोना/केशव भोये, पोशि/योगेश आडे, पोशि/महेश झांजुर्णे, पोशि. अशोक आहेर, पोशि./विजय आव्हाड, पोशि. / सोपान शेळके यांचे पथकाने केलेली आहे.

    kalyan news
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleगुन्हे शाखेची मोठी कारवाई; अवैध शस्त्रसाठा व बनावट नोटांसह सराईत गुन्हेगार अटकेत
    Next Article डोंबिवली शहरात पोलिसांच्या नाकाखाली टीचुन ऑनलाईन लॉटरीचा बेकायदेशीर बाजार.
    crime aala

    Related Posts

    सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी

    July 4, 2026

    कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त

    July 4, 2026

    RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद

    July 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    सराईत वाहनचोर डीबी पथकाच्या जाळ्यात; विष्णुनगर पोलिसांची दमदार कामगिरी

    कल्याण पूर्व लोकग्राममध्ये गाड्यांवर झाड कोसळून मोठे नुकसान; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिक संतप्त

    RTI च्या आड खंडणीचा धंदा उघड! १५ लाखांची डील करताना चौकडी रंगेहात जेरबंद

    उत्तर प्रदेशातून सराईत चोरटा जेरबंद;  38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.