
डोंबिवली (प्रतिनिधी) : लोढाहेवन निळजे येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क. ७११ पंचशिल सामाजिक संस्था (रजि.)पंचशिल महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नाईट अंडर-आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा अर्थात….”संविधान चषक -२०२६” या स्पर्धेचे २१ व २२ मार्च,२०२६ रोजी,आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटक व प्रमुख अतिथी राजेशजी मोरे (आमदार,कल्याण ग्रामीण),अतुलजी झेंडे सर (पोलीस उपायुक्त,परिमंडळ ३,कल्याण),ऍड हर्षाली विजय चौधरी- थविल (महापौर,कल्याण डोंबिवली मनपा.),राहुल दामले (उपमहापौर,कल्याण डोंबिवली मनपा.) राजूदादा पाटील (माजी आमदार),विनोद रतन पाटील (अध्यक्ष -क्रिकेट असोसिएशन,कल्याण ग्रामीण),गजानन मोतीराम पाटील (नगरसेवक,प्रभाग क्रमांक ३१),सौ शैलेजा लालचंद भोईर (नगरसेविका प्रभाग क्रमांक ३१) यांना आमंत्रित करण्यात आले होते.

संविधान चषक २०२६ या स्पर्धेसाठी खासकरून आमदार राजेशजी मोरे तसेच अतुलजी झेंडे सर (पोलीस उपायुक्त,परिमंडळ ३,कल्याण),सुहास हेमाडे (पोलीस सहआयुक्त),संदिपान शिंदे,(वरिष्ठ पोलीस निरीक्षक,मानपाडा) यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित होते.
स्पर्धेसाठी सामजिक क्षेत्रातील बाळाशेठ भोईर,घेसरगाव (उद्योगपती),नागेंद्र फौजदार शर्मा (उद्योगपती),प्रभाकर गोपीनाथ खरबे (उद्योगपती),काशिनाथशेठ पाटील (मा.उपसरपंच),लालचंद भोईर (माजी सरपंच),.तकदिर दशरथ काळण (मा.सरपंच),मा.निवृत्ती चंद्रकांत पाटील (मा.सरपंच),महेंद्र धर्मा पाटील (समाजसेवक),संतोष दीक्षित (उद्योजक),वीरेंद्र सिंग (उद्योजक),कैलास म्हात्रे (उद्योजक),शरद पाटील (उद्योजक), माणिकराव उघडे (रिपब्लिकन नेते),लक्ष्मणराव अंभोरे (रिपब्लिकन नेते),अनंता पाटील (समाजसेवक),.सुभाष अनंता पाटील (विभाग प्रमुख),साईनाथ भोईर (समाजसेवक),सुनील पाटील (जेष्ठ कवी),योगेश दराडे (समाजसेवक),शामराव यादव (समाजसेवक), देवाभाई भोईर,.मजोज भोईर (समाजसेवक),रामकृष्ण पाटील,मंगेश पाटील,ऍड विशाल वाडेकर,पत्रकार भानुदास गायकवाड,पत्रकार विनोद गिरी यांना देखील विशेष आमंत्रित करण्यात आले होते प्रसंगी बऱ्यापैकी आमंत्रित मंडळीनी संविधान चषक २०२६ या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दर्शविली.
संविधान चषक २०२६ या स्पर्धेसाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सन्मान तिन्ही संघटनेच्या वतीने तसेच नवतरुणांनी केला.शिवाय निळजे लोढाहेवन या परिसरात पहिल्यादाच “संविधान चषक २०२६” ही स्पर्धा भरविण्यात आली होती प्रसंगी या स्पर्धेला पहिल्याच वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला.