Close Menu
    What's Hot

    लोढा हेवनमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा जोरदार स्वागत सोहळा

    कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप

    लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    डोंबिवलीत ‘कर्तव्य जननी सन्मान सोहळा’ उत्साहात

    crime aalaBy crime aalaMarch 15, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    डोंबिवली : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘कर्तव्य जननी सन्मान सोहळा’ डोंबिवलीतील आनंद भवन येथे मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आपला ठसा उमटवणाऱ्या  महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.


    शिक्षण, कायदा, सामाजिक कार्य, साहित्य, गृहिणी, नगरसेविका, बस वाहक, सफाई कर्मचारी, पोलीस अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


    कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल (कल्याण-डोंबिवली महानगरपालिका) तसेच ॲड. प्रकाश जगताप (अध्यक्ष, कल्याण फौजदारी वकील संघटना) उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र न्यूजच्या संपादिका अमृता पाटणकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ, रमाबाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

    त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृता पाटणकर यांनी केले.
    यावेळी बोलताना महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत सन्मानित कर्तव्य जननींचे अभिनंदन केले. महिलांनी विविध क्षेत्रांत केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाजघडणीत पत्रकारितेचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.


    ॲड. प्रकाश जगताप यांनीही सत्कारमूर्ती महिलांचे अभिनंदन करत समाजातील बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले. आजच्या काळात कुटुंब व्यवस्था, मुलांचे संगोपन आणि सामाजिक जबाबदाऱ्या या विषयांवर महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.


    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश जोशी यांनी केले. या प्रसंगी सुहास शिंदे (क्राईम मागोवा संपादक), दिलीप मगर, लक्ष्मण हजारे, भानुदास गायकवाड, विनोद गिरी, सचिन ससाणे, राम सावंत, अनिल यादव तसेच महाराष्ट्र न्यूजची संपूर्ण टीम व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
    कार्यक्रमामुळे महिला सशक्तीकरणाचा संदेश देत समाजातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आल्याने उपस्थितांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

    kalyan news
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleरक्त रंजीत डोंबिवली -लक्ष्मण हजारे                 
    Next Article “संविधान चषक -२०२६” या स्पर्धेसाठी आमदार राजेश मोरे व पोलिस उपायुक्त अतुल झेंडे सर यांनी लावली हजेरी…
    crime aala

    Related Posts

    लोढा हेवनमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा जोरदार स्वागत सोहळा

    April 18, 2026

    कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप

    April 15, 2026

    लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    April 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    लोढा हेवनमध्ये सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा जोरदार स्वागत सोहळा

    कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप

    लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    ब्रिजवर स्टंटबाजी करणाऱ्या तिघांवर कारवाई; रील व्हायरल ठरली महागात!

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.