Author: crime aala
डोंबिवली (प्रतिनिधी) : लोढाहेवन निळजे येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क. ७११ पंचशिल सामाजिक संस्था (रजि.)पंचशिल महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नाईट अंडर-आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा अर्थात….”संविधान चषक -२०२६” या स्पर्धेचे २१ व २२ मार्च,२०२६ रोजी,आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटक व प्रमुख अतिथी राजेशजी मोरे (आमदार,कल्याण ग्रामीण),अतुलजी झेंडे सर (पोलीस उपायुक्त,परिमंडळ ३,कल्याण),ऍड हर्षाली विजय चौधरी- थविल (महापौर,कल्याण डोंबिवली मनपा.),राहुल दामले (उपमहापौर,कल्याण डोंबिवली मनपा.) राजूदादा पाटील (माजी आमदार),विनोद रतन पाटील (अध्यक्ष -क्रिकेट असोसिएशन,कल्याण ग्रामीण),गजानन मोतीराम पाटील (नगरसेवक,प्रभाग क्रमांक ३१),सौ शैलेजा लालचंद भोईर (नगरसेविका प्रभाग क्रमांक ३१) यांना आमंत्रित करण्यात आले होते. संविधान चषक २०२६ या स्पर्धेसाठी खासकरून आमदार राजेशजी…
डोंबिवली : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘कर्तव्य जननी सन्मान सोहळा’ डोंबिवलीतील आनंद भवन येथे मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. शिक्षण, कायदा, सामाजिक कार्य, साहित्य, गृहिणी, नगरसेविका, बस वाहक, सफाई कर्मचारी, पोलीस अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांना शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल (कल्याण-डोंबिवली महानगरपालिका) तसेच ॲड. प्रकाश जगताप (अध्यक्ष, कल्याण फौजदारी वकील संघटना) उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र न्यूजच्या संपादिका अमृता पाटणकर यांचीही प्रमुख…
दि.१२ डोंबिवली : एके काळी डोंबिवली म्हटले कि सुसंस्कृत नगरी म्हणुण ओळख असणारे शहर परंतू वाढते लोंढे या मुळे या शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली रस्ते पाणी योजना आहे तिच आहे शहरात राजकिय आणि पोलीस प्रशासनाच्या आर्शवादाने सर्व काही आलबेल चालू आहे राजकिय लोकांच्या आर्शिवादाने बाहेरील गुंड शहरात आसरा घेत आहेत पोलीस प्रशासन राजकिय दबावा खाली जीव मुठीत घेवून काम करताना दिसत आहे शहरामधे लाजीर वाणी गोष्ट आहे की एका बादली भर पाण्यासाठी एका निष्पाप तरूणांची हत्या होते किती लाजीर वाणी गोष्ट आहे ती पण महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री यांचा मुलगा या शहरांचा खासदार आहे तर भाजपा प्रदेश आध्यक्ष व…
मांडवी : मांडवी पोलीस ठाणे हद्दीतून ६० वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून पोलिसांनी नागरिकांना शोध मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.मांडवी पोलीस ठाण्यात मि. मि. रजिस्टर क्रमांक ०७/२०२६ अन्वये दाखल झालेल्या माहितीनुसार, रमेश नायकु पाटील (वय ६० वर्षे) हे दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता आपल्या मुलाला मोबाईलवर “मी बाहेर जात आहे” असे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. याबाबत त्यांचे मुलगे दिनेश रमेश पाटील (वय ३५ वर्षे), व्यवसाय – अमूल दूध डेअरी, रा. जांभुळपाडा, पो. दहिसर, चैतरणा, ता. वसई, जि. पालघर यांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र काहीही माहिती मिळाली…
दि.९ भाईंदर (प्रतिनिधी) : गोस्वामी समाजातील ऐक्य, बंधुभाव आणि परस्पर परिचय वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने गोसवामी सेवा समितीतर्फे पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा रविवारी (८ मार्च २०२६) भाईंदर पूर्व येथील अंबेश बँक्वेट हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील अनेक कुटुंबांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर कुटुंब परिचय सत्रात विविध कुटुंबांनी आपला परिचय करून दिला. पुढे आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती जागरण भजन संध्येमुळे सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. यानंतर स्वागत समारंभ व सामाजिक विषयांवरील मार्गदर्शनपर भाषणांचा कार्यक्रम पार पडला. समाजातील ऐक्य, परस्पर सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी वाढविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व…
दि.७( सांगली): सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या २ री अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर स्पर्धा २०२५-२०२६ निवड चाचणीत ACB नांदेडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दमदार कामगिरी करत राज्यस्तरावर आपली छाप पाडली. स्पर्धेत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक कदम (ACB नांदेड) यांनी GO टेबल टेनिस ५०+ गटात प्रथम क्रमांक पटकावला. तर पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे (ACB नांदेड) यांनी NGO टेबल टेनिस ४०+ गटात प्रथम क्रमांक मिळवित अव्वल स्थान पटकावले. याशिवाय पोलीस हवालदार संतोष पुलगमवार (बक्कल क्र. ५९८) यांनी NGO बॅडमिंटन ४०+ गटात द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या कामगिरीमुळे ACB नांदेडच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत असून संबंधित अधिकारी…
दि.५(डोंबिवली) : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत डोंबिवली विभागात “विद्यार्थी सुरक्षा व उपाय योजना मार्गदर्शन शिबिर” हा उपक्रम गुरुवारी (५ मार्च) जिमखाना हॉल, जिमखाना रोड, डोंबिवली पूर्व येथे पार पडला. “सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित शाळा, सुरक्षित प्रवास” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला शाळांचे शिक्षक, बस चालक-मालक संघटना तसेच पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. बस चालक-मालक संघटना, शिक्षक आणि चालकांच्या समस्या व अडचणी ऐकून घेत त्यांनी त्यावर विविध उपाययोजना सुचवल्या. यावेळी विद्यानिकेतन शाळेचे पंडित सर यांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन…
दि. ४ कल्याण :कोळसेवाडी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत कारवाई करत ५ लाखांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून ८ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २.३६ लाखांची रोकड, दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.तक्रारदार दीपक शिंदे (रा. वाघोली, पुणे) यांना आरोपींनी ५ लाखांच्या बदल्यात ७ लाख रुपये (१०, ५० व १०० च्या नोटांमध्ये) देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार त्यांना कल्याण पूर्व येथील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात बोलावण्यात आले.तक्रारदार ५ लाखांची रोकड घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच, स्कॉर्पिओमधून आलेल्या तीन-चार जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवले. पैसे बदलणाऱ्या इसमाला गाडीत बसवून तक्रारदार यांच्या हातातील ५ लाखांची…
दि.३ कल्याण : धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ ३ कल्याणमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला . पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सण शांततेत पार पाडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. ९० फीट रोड, गांधारी, पत्रिपूल या ठिकाणी जागो जागी नाकाबंदी केले असल्याची माहिती या वेळी देण्यात आली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी नागरिकांना शांततेत व सुरक्षितरीत्या सण साजरा करण्याचे आवाहन केले.
दि २ कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “विद्यार्थी सुरक्षा व उपाय योजना मार्गदर्शन शिबिर” कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी तसेच स्कूल बस चालक-मालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांमुळे सभागृह भरले होते. “सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित शाळा, सुरक्षित प्रवास” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजी सकाळी ३.३० वाजता के.सी. गांधी सभागृह, वल्लीपीर रोड, कल्याण (पूर्व) येथे पार पडला. कार्यक्रमात उपप्रादेशिक अधिकारी आशुतोष बारकुल यांनी “स्कूल बस म्हणजे नेमके काय?” याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. स्कूल बसची कायदेशीर व्याख्या, आवश्यक कागदपत्रे, शासनाने निर्धारित केलेले सुरक्षा निकष, चालकांची…
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.