
दि.७( सांगली): सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या २ री अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर स्पर्धा २०२५-२०२६ निवड चाचणीत ACB नांदेडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दमदार कामगिरी करत राज्यस्तरावर आपली छाप पाडली.
स्पर्धेत अप्पर पोलीस अधीक्षक अशोक कदम (ACB नांदेड) यांनी GO टेबल टेनिस ५०+ गटात प्रथम क्रमांक पटकावला. तर पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे (ACB नांदेड) यांनी NGO टेबल टेनिस ४०+ गटात प्रथम क्रमांक मिळवित अव्वल स्थान पटकावले.
याशिवाय पोलीस हवालदार संतोष पुलगमवार (बक्कल क्र. ५९८) यांनी NGO बॅडमिंटन ४०+ गटात द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या कामगिरीमुळे ACB नांदेडच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.