
मांडवी : मांडवी पोलीस ठाणे हद्दीतून ६० वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून पोलिसांनी नागरिकांना शोध मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मांडवी पोलीस ठाण्यात मि. मि. रजिस्टर क्रमांक ०७/२०२६ अन्वये दाखल झालेल्या माहितीनुसार, रमेश नायकु पाटील (वय ६० वर्षे) हे दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता आपल्या मुलाला मोबाईलवर “मी बाहेर जात आहे” असे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतले नाहीत.
याबाबत त्यांचे मुलगे दिनेश रमेश पाटील (वय ३५ वर्षे), व्यवसाय – अमूल दूध डेअरी, रा. जांभुळपाडा, पो. दहिसर, चैतरणा, ता. वसई, जि. पालघर यांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र काहीही माहिती मिळाली नसल्याने त्यांनी मांडवी पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली आहे.
बेपत्ता इसमाचे वर्णन
नाव : रमेश नायकु पाटील
वय : ६० वर्षे
उंची : सुमारे ५ फूट ६ इंच
रंग : सावळा
केस : काळे-पांढरे
डोळे : काळे
चेहरा : उभट
अंगावरील कपडे : हिरव्या रंगाचा हाफ टी-शर्ट, काळ्या रंगाची बरमुडा हाफ पॅन्ट
पायात : लाल रंगाची स्पार्क कंपनीची चप्पल
भाषा : मराठी
या वर्णनाचा इसम कुठे आढळल्यास किंवा त्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास मांडवी पोलीस ठाणे किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
संपर्क : ८६५५७२७६१७
मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.