Close Menu
    What's Hot

    भाईंदरमध्ये गोस्वामी सेवा समितीचा पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा उत्साहात संपन्न

    सांगलीतील राज्यस्तरीय स्पर्धेत ACB नांदेडची विजयी कामगिरी

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढाकार; डोंबिवलीत मार्गदर्शन शिबिर संपन्न

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढाकार; डोंबिवलीत मार्गदर्शन शिबिर संपन्न

    crime aalaBy crime aalaMarch 5, 2026Updated:March 5, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    दि.५(डोंबिवली) : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत डोंबिवली विभागात “विद्यार्थी सुरक्षा व उपाय योजना मार्गदर्शन शिबिर” हा उपक्रम गुरुवारी (५ मार्च) जिमखाना हॉल, जिमखाना रोड, डोंबिवली पूर्व येथे पार पडला. “सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित शाळा, सुरक्षित प्रवास” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाला शाळांचे शिक्षक, बस चालक-मालक संघटना तसेच पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

    या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. बस चालक-मालक संघटना, शिक्षक आणि चालकांच्या समस्या व अडचणी ऐकून घेत त्यांनी त्यावर विविध उपाययोजना सुचवल्या.


    यावेळी विद्यानिकेतन शाळेचे पंडित सर यांनीही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करताना डोंबिवलीतील वाढत्या वाहतूक कोंडीबाबत नाराजी व्यक्त केली व त्यावर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली.


    कल्याण ट्रॅफिक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवाडकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेमध्ये पोलीसांसोबतच पालक, विद्यार्थी आणि शाळांचीही महत्त्वाची जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली.


    या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक परिवहन विभागअमित नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड (डोंबिवली पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे (मानपाडा पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम (टिळकनगर पोलीस स्टेशन), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे ( विष्णू नगर पोलीस स्टेशन),गटविकास अधिकारी सुनीता मोटघरे मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात जनजागृती करणे आणि सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असून कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला. 

    kalyan news
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleकल्याणमध्ये ‘सुट्या नोटांचा’ बनाव; ५ लाखांची लूट – ८ जण अटकेत
    Next Article सांगलीतील राज्यस्तरीय स्पर्धेत ACB नांदेडची विजयी कामगिरी
    crime aala

    Related Posts

    कल्याणमध्ये ‘सुट्या नोटांचा’ बनाव; ५ लाखांची लूट – ८ जण अटकेत

    March 4, 2026

    धुलिवंदनला पोलिसांचा कडक बंदोबस्त.

    March 3, 2026

    कल्याणात ‘विद्यार्थी सुरक्षा’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    भाईंदरमध्ये गोस्वामी सेवा समितीचा पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा उत्साहात संपन्न

    सांगलीतील राज्यस्तरीय स्पर्धेत ACB नांदेडची विजयी कामगिरी

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढाकार; डोंबिवलीत मार्गदर्शन शिबिर संपन्न

    कल्याणमध्ये ‘सुट्या नोटांचा’ बनाव; ५ लाखांची लूट – ८ जण अटकेत

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.