Close Menu
    What's Hot

    भाईंदरमध्ये गोस्वामी सेवा समितीचा पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा उत्साहात संपन्न

    सांगलीतील राज्यस्तरीय स्पर्धेत ACB नांदेडची विजयी कामगिरी

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढाकार; डोंबिवलीत मार्गदर्शन शिबिर संपन्न

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    कल्याणमध्ये ‘सुट्या नोटांचा’ बनाव; ५ लाखांची लूट – ८ जण अटकेत

    crime aalaBy crime aalaMarch 4, 2026Updated:March 4, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp


    दि. ४ कल्याण :कोळसेवाडी पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या काही तासांत कारवाई करत ५ लाखांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून ८ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत २.३६ लाखांची रोकड, दोन स्कॉर्पिओ गाड्या आणि ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

    तक्रारदार दीपक शिंदे (रा. वाघोली, पुणे) यांना आरोपींनी ५ लाखांच्या बदल्यात ७ लाख रुपये (१०, ५० व १०० च्या नोटांमध्ये) देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार त्यांना कल्याण पूर्व येथील विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात बोलावण्यात आले.
    तक्रारदार ५ लाखांची रोकड घेऊन ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच, स्कॉर्पिओमधून आलेल्या तीन-चार जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवले. पैसे बदलणाऱ्या इसमाला गाडीत बसवून तक्रारदार यांच्या हातातील ५ लाखांची बॅग हिसकावून आरोपी स्कॉर्पिओने फरार झाले.
    या घटनेप्रकरणी दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा रजि. क्र. १०३/२०२६ भा.न्या.स. कलम ३१० (२), ३०९ (४)(६), २०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.



    गुन्हे शोध पथकाने मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींची स्कॉर्पिओ जुना पुणे महामार्गाने जात असल्याची माहिती मिळवली. तत्काळ तळेगाव दाभाडे पोलीसांच्या मदतीने सोमाटणे टोलनाक्यावर (MH-04-GD-7823) स्कॉर्पिओसह चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
    यानंतर आळंदीमार्गे अहिल्यानगर-शिर्डी रोडकडे पळालेल्या उर्वरित आरोपींना राहुरी पोलीसांच्या मदतीने नाकाबंदी करून अटक करण्यात आली. आणखी एक आरोपी पुढील ३६ तासांत जेरबंद करण्यात आला.


    जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे:

    चोरीतील रोख रक्कम – ₹२,३६,०००
    दोन स्कॉर्पिओ गाड्या
    ९ मोबाईल फोन
    इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    ही कारवाई अतुल झेंडे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण), कल्याणजी घेटे (सहाय्यक पोलीस आयुक्त)  तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव व पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या .

    मार्गदर्शनाप्रमाणे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि. संदिप भालेराव, पोउनि. जगन सापटे, पोहवा./२१५जाधव, पोहवा /१२२६ सांगळे, पोहवा/५०३वाध, पोहवा /२४८६ मुसळे, पोहवा /६५९६ जरग, पोहवा/३११२ सौंदाणे, पोहवा /६९३०घुगे, पोहवा. /२२८३आव्हाड, पोहवा /१५३२बोरसे, पोहवा/६५४८ सांगळे, पोहवा/६२५६ कापडी, पोना/४५७कोती, पोना/५०२५फटांगरे, पोशि./८४१४गिते, पोशि/१५२६ इंगळे, यांनी केली आहे.


    कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने समन्वय साधत अवघ्या पाच तासांत आरोपींना ताब्यात घेऊन उल्लेखनीय कामगिरी बजावली.

    kalyan news
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleधुलिवंदनला पोलिसांचा कडक बंदोबस्त.
    Next Article विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढाकार; डोंबिवलीत मार्गदर्शन शिबिर संपन्न
    crime aala

    Related Posts

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढाकार; डोंबिवलीत मार्गदर्शन शिबिर संपन्न

    March 5, 2026

    धुलिवंदनला पोलिसांचा कडक बंदोबस्त.

    March 3, 2026

    कल्याणात ‘विद्यार्थी सुरक्षा’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    भाईंदरमध्ये गोस्वामी सेवा समितीचा पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा उत्साहात संपन्न

    सांगलीतील राज्यस्तरीय स्पर्धेत ACB नांदेडची विजयी कामगिरी

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढाकार; डोंबिवलीत मार्गदर्शन शिबिर संपन्न

    कल्याणमध्ये ‘सुट्या नोटांचा’ बनाव; ५ लाखांची लूट – ८ जण अटकेत

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.