
दि.३ कल्याण : धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ ३ कल्याणमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला . पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सण शांततेत पार पाडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
९० फीट रोड, गांधारी, पत्रिपूल या ठिकाणी जागो जागी नाकाबंदी केले असल्याची माहिती या वेळी देण्यात आली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी नागरिकांना शांततेत व सुरक्षितरीत्या सण साजरा करण्याचे आवाहन केले.