Author: crime aala
दि. १(डोंबिवली ):डोंबिवली शहर आणि परिसरात अवैध ऑनलाईन लॉटऱ्या जोरात चालू आहेत. पण डोंबिवलीतील स्थानिक पोलीस या अवैध, दोन नंबरच्या धंद्यांकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. दिवस रात्र या लॉटऱ्याच्या दुकानात सामान्य माणसांची गर्दी पाहायला मिळते. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर लॉटरी माफिया शंकर अहुजा याने स्वतःचा अॅप तयार करून ऑनलाईनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे लॉटरीचा गोरख धंदा सुरू केला आहे. यामुळे सरकारचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडवला जात आहे. तर दुसरीकडे लॉटरीच्या माध्यमातून केवळ माफियांनाच फायदा होत असल्याने लॉटरी खेळणारी अनेक कुटुंब देशोधडीला लागत चालली आहेत. राज्यात ऑनलाइन लॉटरीवर बंदी असतानाही, त्यात मुंबईला अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे तरीही मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत…
पोलिस–प्रतिष्ठानच्या संयुक्त पुढाकारातून ३८५ जणांचे श्रमदान दि. १ (कल्याण) : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत रविवारी सकाळी व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान पार पडले. दि. ०१ मार्च २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून खडकपाडा सर्कल ते बिर्ला कॉलेज मुख्य रस्ता तसेच खडकपाडा सर्कल ते दुर्गाडी मुख्य रस्ता या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रस्त्यांवरील कचरा, प्लास्टिक व इतर घाण साफ करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत परिमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रांत…
दि.१ (कल्याण ): कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोरील शंकरराव चौक येथील वाहतूक बेटावर प्रस्तावित मोबाईल टॉवर उभारणीच्या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र हरकती नोंदवल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते वल्ली एस. राजन यांनी याबाबत आयुक्त अभिजीत गोयल यांना निवेदन सादर करून निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मोबाईल टॉवर उभारणीसाठी महापालिकेची अधिकृत मंजुरी, राज्य शासनाची परवानगी तसेच Department of Telecommunications आणि Telecom Regulatory Authority of India यांच्या नियमांचे पालन अनिवार्य आहे. याशिवाय EMF Radiation Norms, सार्वजनिक सुरक्षितता, अर्बन प्लॅनिंग आणि रोड सेफ्टीच्या निकषांचे काटेकोर पालन झाले आहे का, याबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. सदर ठिकाणाच्या परिसरात शाळा, निवासी वस्ती…
सभागृहनेतेपदी हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेतेपदी अशरफ ऊर्फ शानू पठाण यांची निवड दि.२३ ठाणे : ठाणे महानगरपालिकाच्या महासभेत आज महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी सभागृहनेतेपदी शिवसेनेचे हणमंत जगदाळे, तर विरोधी पक्षनेतेपदी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे गटनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. महासभेत झालेल्या या घोषणेमुळे महापालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून, आगामी काळात सभागृहातील राजकीय रणधुमाळीला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे, तसेच महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते.महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ…
दि.२३ कल्याण :खडकपाडा पोलीस स्टेशन हद्दीत भरधाव वेगात स्टंटबाजी आणि रेसिंग करणाऱ्या कारचालकाने अॅक्टिवा चालकाला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी केवळ ४८ तासांत आरोपीस वाहनासह ताब्यात घेत ठोस कारवाई केली आहे. दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता नवीन वडवली रोड, भंडारी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात चारचाकी वाहनाने भरधाव वेगात अॅक्टिवा क्र. एमएच ०५ सीएन ०२६३) ला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अॅक्टिवा चालकाच्या डोक्याला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. जखमींच्या मुलाने दि. १९ फेब्रुवारी रोजी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गु.रं.नं. ९१/२०२६ भा.न्या.सं. ११०, २८१, १२५ (अ)(ब) तसेच…
दि. २३ कल्याण : जय गोस्वामी सामाजिक सेवा संस्था (नोंदणीकृत), मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने होळी स्नेह मिलन उत्सव तसेच समाज कल्याणासाठी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी, दुपारी २ ते ४ या वेळेत कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ७ येथील सीआरएम हॉल, अंडर ब्रिज येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकी, परस्पर सहकार्य आणि दानधर्माचे महत्त्व यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. “जर पक्षी तुळशी पितो तर नदीचे पाणी कमी होत नाही; जर तुम्ही दान केले तर तुमची संपत्ती कमी होत नाही, रघुवीर तुम्हाला मदत करतो,” या प्रेरणादायी संदेशातून समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित…
दि.२३ कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) चे आयुक्त अभिनव गोयल यांच्या तात्काळ बदलीची मागणी करत सुजाण नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात लेखी निवेदन सादर केले आहे. शहरातील वाढते अनधिकृत बांधकाम, बकाल रस्ते, आरोग्य सेवेची दयनीय अवस्था आणि प्रशासनातील कथित ढिसाळ कारभार यावर संताप व्यक्त करत ही मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, केडीएमसीमध्ये निवडणुका होण्यापूर्वी प्रशासक म्हणून कार्यरत असताना आयुक्तांच्या काळात कोणतीही ठोस विकासकामे झाली नाहीत. उलट नागरी सुविधांचे “तीन तेरा” वाजल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून फेरीवाल्यांचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही, असा दावा करण्यात आला. आरोग्य सेवांबाबतही गंभीर…
दि.२३ कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेली इयत्ता ५ वी व ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि. २२) सुरळीत वातावरणात पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी आयोजित या परीक्षेत इयत्ता ५ वीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २४९ शाळांमधील ४३०३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तर इयत्ता ८ वीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १९५ शाळांमधील २४३९ विद्यार्थी परीक्षेला बसले. एकूण ६७४२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी महानगरपालिका क्षेत्रात २८ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. केंद्रांवर देखरेख…
दि :२१ कल्याण : परिमंडळ ३ मध्ये पोलिसांनी मध्यरात्री जोरदार धडक कारवाई करत बार आणि रेल्वे स्टेशन परिसरातील गैरप्रकारांवर मोठा आळा घातला. अवैध प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांना थेट कायद्याचा धाक दाखवत पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, शहरातील अश्लीलता आणि अनैतिक धंद्यांना थारा दिला जाणार नाही. काल रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास रिगल बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच एसीपी सुहास हेमाडे यांनी स्वतः पथकासह घटनास्थळी धडक दिली. अचानक तपासणीदरम्यान बारमध्ये तब्बल २३ मुली आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय गुंड, API संपत फडोळ, API के. आर. पाटील व इतर अधिकाऱ्यांचा समावेश…
दि.१८ डोंबिवली: उच्च रक्तदाबावर वापरल्या जाणाऱ्या Telma AM (Telmisartan 40mg & Amlodipine 5mg) या औषधांच्या नावाखाली बनावट गोळ्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि मानपाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत सुमारे ₹८,९४,४०० किमतीच्या २,७९५ स्ट्रीप्स जप्त करण्यात आल्या. तपासात उघड झाले की, आरोपींनी मूळ उत्पादक कंपनीचे औषध असल्याचा भास निर्माण करून “श्रीराम फार्मा” या परवानाधारक मेडिकलमार्फत विक्री केली. औषध बनावट व आरोग्यास अपायकारक असल्याची माहिती असूनही जाणीवपूर्वक विक्री केल्याचा गंभीर आरोप आहे. या गंबीर गुन्ह्यात अटकेतील आरोपी पुढील प्रमाणे१)पंकज राधेश्याम उपाध्याय (३३, रा. दावडी, डोंबिवली पूर्व) – डिस्ट्रीब्युटर व मेडिकल व्यावसायिक (अटक: २१…
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.