Close Menu
    What's Hot

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    अवैध ऑनलाईन लॉटऱ्याचा धुमाकूळ; मानपाडा पोलिसांचे दुर्लक्ष…

    crime aalaBy crime aalaMarch 1, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    दि. १(डोंबिवली ):डोंबिवली शहर आणि परिसरात अवैध ऑनलाईन लॉटऱ्या जोरात चालू आहेत. पण डोंबिवलीतील स्थानिक पोलीस या अवैध, दोन नंबरच्या धंद्यांकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. दिवस रात्र या लॉटऱ्याच्या दुकानात सामान्य माणसांची गर्दी पाहायला मिळते.

    डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर लॉटरी माफिया शंकर अहुजा याने स्वतःचा अ‍ॅप तयार करून ऑनलाईनच्या नावाखाली बेकायदेशीरपणे लॉटरीचा गोरख धंदा सुरू केला आहे. यामुळे सरकारचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडवला जात आहे. तर दुसरीकडे लॉटरीच्या माध्यमातून केवळ माफियांनाच फायदा होत असल्याने लॉटरी खेळणारी अनेक कुटुंब देशोधडीला लागत चालली आहेत.

    राज्यात ऑनलाइन लॉटरीवर बंदी असतानाही, त्यात मुंबईला अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे तरीही मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऑनलाईन लॉटरी जोरात चालू आहे. अवैध ऑनलाईन लॉटऱ्या सुरु असल्याची सर्व माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांना माहिती आहे तरीही ते याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

    अवैध लॉटरी चालवणारा चालक मालक माफिया शंकर अहुजा ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे पाठीशी घालत आहेत का? लॉटऱ्याचा धंदा करण्यासाठी खुलेआम मदत करत आहेत का? जर मदत करत नसतील तर अवैध लॉटरी चालवणारा चालक मालक माफिया शंकर अहुजा यावर कारवाई का होत नाहीये? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

    दिवसरात्र चालणाऱ्या या लॉटरीच्या नादात अनेक तरुण, नोकरदार, बिगारी काम करणारे, नशेच्या आहारी गेलेली लोक कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून आपली कष्टाची कमाई या जुगारात गमावत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होत असून, अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.

    या गंभीर प्रकाराकडे ठाणे आयुक्त, कल्याण उप आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी तातडीने लक्ष घालून, या अवैध लॉटरी सेंटर चालवणाऱ्या चालक मालक शंकर अहुजा याच्यावरती ताबडतोब कारवाई करावी तसेच त्याला मदत करणाऱ्या असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचीही चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

    kalyan news
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleपरिमंडळ ३ कल्याणमध्ये भव्य स्वच्छता अभियान;
    Next Article कल्याणात ‘विद्यार्थी सुरक्षा’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
    crime aala

    Related Posts

    आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात

    August 12, 2026

    आंबिवलीतील इराणी वस्तीत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; एमडीसह तिघे ताब्यात

    August 12, 2026

    कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहव्यापाराच्या रॅकेटवर ‘मोक्का’चा फास

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    Казино Yard – полный гид по функциям и возможностям онлайн-казино

    Sahabet Casino Giriş | Sahabet | Sahabet Güncel Giriş

    Cosmo Casino Online New Zealand – Responsible Gambling and Fair Play

    Meilleur Casino en Ligne 2026 – Top 10 des Casinos Fiables

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility
    chicken road crossing game chicken road game download chicken road casino game chicken road game app chicken road 2.0 where to play chicken road in Canada chicken road review chicken road review
    shabiki app premier bet zone

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.