Close Menu
    What's Hot

    भाईंदरमध्ये गोस्वामी सेवा समितीचा पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा उत्साहात संपन्न

    सांगलीतील राज्यस्तरीय स्पर्धेत ACB नांदेडची विजयी कामगिरी

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढाकार; डोंबिवलीत मार्गदर्शन शिबिर संपन्न

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    कल्याणमध्ये मोबाईल टॉवरला नागरिकांचा विरोध; निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी

    crime aalaBy crime aalaMarch 1, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    दि.१ (कल्याण ): कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोरील शंकरराव चौक येथील वाहतूक बेटावर प्रस्तावित मोबाईल टॉवर उभारणीच्या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र हरकती नोंदवल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते वल्ली एस. राजन यांनी याबाबत आयुक्त अभिजीत गोयल यांना निवेदन सादर करून निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.


    निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मोबाईल टॉवर उभारणीसाठी महापालिकेची अधिकृत मंजुरी, राज्य शासनाची परवानगी तसेच Department of Telecommunications आणि Telecom Regulatory Authority of India यांच्या नियमांचे पालन अनिवार्य आहे. याशिवाय EMF Radiation Norms, सार्वजनिक सुरक्षितता, अर्बन प्लॅनिंग आणि रोड सेफ्टीच्या निकषांचे काटेकोर पालन झाले आहे का, याबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे.


    सदर ठिकाणाच्या परिसरात शाळा, निवासी वस्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय संख्या असल्याने मोबाईल टॉवरमधून निर्माण होणाऱ्या विद्युतचुंबकीय किरणोत्सर्गाच्या (EMF) संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विविध अभ्यासांचा दाखला देत डोकेदुखी, झोपेचे विकार, थकवा, चक्कर येणे, स्मरणशक्तीवर परिणाम तसेच हृदयविकाराशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो, असे निवेदनात नमूद आहे.


    महानगरपालिका ही नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेची जबाबदार संस्था असल्याने संबंधित परवानगी सर्व नियम व निकष पूर्ण करूनच देण्यात आली आहे का, याची सखोल चौकशी करावी. आवश्यक असल्यास संबंधित कंपनीस दिलेली परवानगी रद्द करून पर्यायी व सुरक्षित ठिकाण निश्चित करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.


    दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

    kalyan news
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!
    Next Article परिमंडळ ३ कल्याणमध्ये भव्य स्वच्छता अभियान;
    crime aala

    Related Posts

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढाकार; डोंबिवलीत मार्गदर्शन शिबिर संपन्न

    March 5, 2026

    कल्याणमध्ये ‘सुट्या नोटांचा’ बनाव; ५ लाखांची लूट – ८ जण अटकेत

    March 4, 2026

    धुलिवंदनला पोलिसांचा कडक बंदोबस्त.

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    भाईंदरमध्ये गोस्वामी सेवा समितीचा पहिला कुटुंब परिचय व होळी प्रेम मेळावा उत्साहात संपन्न

    सांगलीतील राज्यस्तरीय स्पर्धेत ACB नांदेडची विजयी कामगिरी

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा पुढाकार; डोंबिवलीत मार्गदर्शन शिबिर संपन्न

    कल्याणमध्ये ‘सुट्या नोटांचा’ बनाव; ५ लाखांची लूट – ८ जण अटकेत

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.