दि.२६ (खडवली ): समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यानुसार स्व. नितीन उमाकांत चौधरी (बाळू) जाणता प्रतिष्ठान, ठाकुर्ली पूर्व यांच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा परिषद शाळा, खाकरवाडी (खडवली पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी लेझीम नृत्यचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल यांसह शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाणता प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी नियोजन व सहकार्य केले. या सामाजिक उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीने सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.