दि २७ कल्याण :कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेली हिरो कंपनीची एक्सट्रीम १२५ आर मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत शोधून काढत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, सुमारे ५५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. दि २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते २३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० या कालावधीत, आर.डी. बार, शिळफाटा रोड, कल्याण पूर्व येथील पार्किंगमधून एम.एच.-०५-एफ.एन.-१०४३ क्रमांकाची एक्सट्रीम १२५ आर मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गु.रजि. नं. ९१४/२०२६, भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या…
दि.२६ (खडवली ): समाज सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यानुसार स्व. नितीन उमाकांत चौधरी (बाळू) जाणता प्रतिष्ठान, ठाकुर्ली पूर्व यांच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद शाळा, खाकरवाडी (खडवली पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी लेझीम नृत्यचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सिल यांसह शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाणता प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी नियोजन व सहकार्य केले. या सामाजिक उपक्रमाबद्दल संस्थेच्या वतीने सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा हा…
दी.२६ (डोंबिवली):महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार राजेश मोरे, एसीपी सुहास हेमाडे, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावदवाड, विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार राजेश मोरे , एसीपी सुहास हेमाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी आमदार राजेश मोरे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व नागरिकांना पटवून देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच एसीपी सुहास हेमाडे यांनीही नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत कायदा, संविधान आणि देशाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ यांनी उपस्थित सर्व…
mumbai – राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत मंत्रालयात जाहीर झाली आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. एकूण २९ महापालिकांपैकी १७ ठिकाणी खुला प्रवर्ग, ८ ठिकाणी ओबीसी, ३ ठिकाणी अनुसूचित जाती आणि एका ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निश्चित झाले आहे. 29 महापौरपदांसाठी आरक्षण खालीलप्रमाणे… अनुसूचित जमाती – 1 अनुसूचित जाती – 3 नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8 सर्वसाधारण – 17 कोणत्या महापालिकेसाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण? मुंबई – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव) ठाणे – ‘एससी’ अर्थात अनुसूचित जाती प्रवर्ग नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिलांसाठी राखीव) मीरा भाईंदर – खुला…
mumbai – मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यादृष्टीने ‘मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प’ राबविण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या टाऊनशिप प्रकल्पाद्वारे सुमारे पाच कोटी चौरस फूट क्षेत्राचे विकसन करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या टाऊनशिपसाठी लागणारा ३० टक्के निधी शासन देणार आहे. तर उर्वरित ७० टक्के निधी एमएसआयडीसी शासन हमीद्वारे विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरुपात उभारणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक व…