
बदलापूर (प्रतिनिधी): बदलापूर पाईप लाईन रोड वरील येथील नेवाळी नाका परिसरात आज सकाळी एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यात आडवा झाला. या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून कामावर जाणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली
सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र ट्रक हटविण्याचे काम सुरू असून वाहतूक काही काळ विस्कळीत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
.अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.