Close Menu
    What's Hot

    कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप

    लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    ब्रिजवर स्टंटबाजी करणाऱ्या तिघांवर कारवाई; रील व्हायरल ठरली महागात!

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    city

    कोळसेवाडी पोलिसांची झटपट कारवाई

    crime aalaBy crime aalaJanuary 29, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    कल्याण, दि. २८ — कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वाहनफोडी व चोरीच्या घटनेचा वेगाने तपास करत पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावत अवघ्या सहा तासांत आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेला लॅपटॉपही हस्तगत केला आहे.

    दि.२७ रोजी रात्री ७.३० ते दि. २८ रोजी सकाळी ८.०० वाजेच्या सुमारास, रेजेन्सी पार्क परिसरात, चक्कीनाका, कल्याण (पूर्व) येथे पार्क केलेल्या हुंडाई आय-२० (क्रमांक एम.एच. ०५ सी.व्ही. ६४१०) या वाहनाची काच फोडून अज्ञात इसमाने वाहनातील काळ्या रंगाचा डेल कंपनीचा लॅपटॉप चोरून नेला होता. याच परिसरात उभ्या असलेल्या आणखी पाच वाहनांच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले होते.

    या घटनेप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (ब) व ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

    मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी सापळा रचत आरोपी सुजल बाबासाहेब वाघचौरे (वय २१), रा. गोसावीपुरा, चक्कीनाका, कल्याण (पूर्व) याला अटक केली.

    अटक केलेल्या आरोपीकडून सुमारे १८ हजार रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे.

    ही यशस्वी कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३, कल्याण अतुल झेंडे व सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप भालेराव यांच्यासह पोह ५०३ विशाल वाघ, पोह २१५ दत्तु जाधव, पोह ६९३० गोरखनाथ घुगे, पोह ४२० रोहित बुधवंत, पोह ६५९६ विलास जरग व पोलीस नाईक ४५७ दिलीप कोती यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

    kalyan news
    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमान अपघातात दुर्दैवी निधन
    Next Article अजितदादा पवार यांना कल्याण–डोंबिवलीत भावपूर्ण निरोप
    crime aala

    Related Posts

    कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप

    April 15, 2026

    लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    April 11, 2026

    ब्रिजवर स्टंटबाजी करणाऱ्या तिघांवर कारवाई; रील व्हायरल ठरली महागात!

    April 8, 2026

    Comments are closed.

    Latest Posts

    कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप

    लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

    ब्रिजवर स्टंटबाजी करणाऱ्या तिघांवर कारवाई; रील व्हायरल ठरली महागात!

    KDMC अतिक्रमण विभागाची निवडक कारवाई? फेरीवाल्यांवर हात, तर “ चहा–मोमो” स्टॉल बिनधास्त!

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.