Author: yuvasutra1@gmail.com

thane – जिल्ह्यात बालविवाहाची सामाजिक कुप्रथा पूर्णतः मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांनी दिला आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह करणे हा दखलपात्र गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये कोणालाही सूट दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये संबंधित पालक, मध्यस्थ, विवाह सभागृहाचे मालक, धर्मगुरू, विवाह लावणाऱ्या व्यक्ती तसेच बालविवाहास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दोषींना कारावास व दंडाची तरतूद कायद्यात असून कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण,…

Read More

mumbai – निवडणुक आयोगाने राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात येणार असून 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली. राज्यातील 2869 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 1442 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. आज पासून 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी आचार संहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम… नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचा कालावधी: 23 – 30 डिसेंबर 2025नामनिर्देशन पत्रांची छाननी : 31 डिसेंबर 2025उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : 2 जानेवारी 2026निवडणूक चिन्ह वाटप : 3 जानेवारी 2026अंतिम उमेदवाराची यादी : 3…

Read More

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभागाची कारवाई… kalyan – कल्याण पश्चिमेत गांजा या अंमली पदार्थासह ओडीसा राज्यातील दोघांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभागाने हि धडक कारवाई केली असून, या कारवाईत एकूण २२.२७१ किलो गांजा (किंमत ४,४५,४२०/- रुपये) जप्त करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेतील बैल बाजार वैकुंठ धाम स्मशान भूमी समोर पोलिसांना दोन जण संशयास्पदरित्या आढळून आले. झडती घेतली असता त्यांच्याजवळ एकूण २२.२७१ किलो गांजा (किंमत ४,४५,४२०/- रुपये) गांजा मिळून आला. तसेच गिरोधारी देव्हारी आणि ईशम्भूशाहू साहू अशी त्या दोघांनी नावे सांगितली. सदर प्रकरणी गांजा जप्त करण्यात आला असून, या दोघांविरुद्ध महात्मा फुले…

Read More

nagpur – मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली. भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साधारणत १९ हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात. १९६० पूर्वीच्या या इमारती आहेत. त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झाला आहे. काही इमारती जीर्ण होऊन पडल्या आहेत. तर, जवळपास १३ हजारांपेक्षा जास्त इमारती पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. या इमारतीतल्या भाडेकरुंना हक्क महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टनुसार संरक्षण प्राप्त आहे. या इमारती तसेच त्यातील भाडेकरु व करारनामे कायदेशीर आहेत. शासनाने…

Read More

thane – तरुण पिढीमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या वापरावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर (N-CORD) समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी आज निवासी जिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस आयुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, ऑद्यौगिक सुरक्षा कार्यालय, कल्यण, ठाणे, जिल्हा आरोग्य कार्यालय, ठाणे, जिल्हा शिक्षण विभाग, ठाणे (प्राथमिक व माध्यमिक), शिक्षण अधिकारी, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर व कल्याण महानगरपालिका, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, ठाणे, जिल्हा कृषि अधिक्षक, ठाणे, उपवन…

Read More

nagpur – विधानसभेत नगरविकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या सन 2025-26 च्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या. विधानसभेत नगरविकास विभागाच्या सन 2025-26 या वर्षाच्या एकूण 9 हजार 195 कोटी 76 लाख 58 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या 196 कोटी 57 लाख 17 हजार रुपयांच्या मागण्याना मंजुरी देण्यात आली. गृहनिर्माण विभागाच्या 91.9 कोटींच्या मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्याच्या चर्चेत विधानसभेतील विविध सदस्य सहभागी झाले होते.

Read More

nagpur – गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता; कायद्यातील तरतुदींनुसार ‘हार्म आणि हर्ट’ या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख, अमीन पटेल यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात अवैध गुटखा, विक्री व वहन संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्यात गुटखा बंदी आहे.गुटखा…

Read More

nagpur – विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज पासून नागपुरात सुरू झाले असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्या सादर केल्या. अधिवेशनात एकूण रु. ७५,२८६.३८ कोटींच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर करण्यात आल्या आहेत. यापैकी रु. २७,१६७.४९ कोटींच्या अनिवार्य, रु.३८,०५९.२६ कोटींच्या कार्यक्रमांतर्गत व रु. १०,०५९.६३ कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पुरवणी मागण्यांपैकी १५ हजार ६४८ कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी ६ हजार कोटींहून अधिक तर मनरेगासाठी…

Read More

nagpur – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज पासून नागपुरात सुरू झाले असून, यात १८ विधेयके मांडली जाणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील मोठ्या राज्यांमध्ये सर्व निकषांत अग्रेसर असणारी अर्थव्यवस्था आहे. राज्यात पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या सुमारे ९२ टक्के म्हणजेच ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. केवायसी (KYC) प्रक्रियेमुळे राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत…

Read More

mumbra – अंमली पदार्थ विक्री करणा-या गुन्हेगारास मुंब्रा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून २ किलो (किंमत एक करोड दहा लाख पंचवीस हजार) चरस जप्त केला आहे. मोहम्मद हारून हसरत अली सिद्धीकी असे याचे नाव आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाची विक्री व सेवन करण्याचे प्रमाण वाढले असून, त्या अनुषंगाने वरिष्ठ. पो.निरी. अनिल शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे एन.डी.पी.एस पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अंमली पदार्थ विक्री व सेवन करणा-या इसमांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने पोलीस पथक मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना कौसा काळसेकर परिसरातील, ऐरोली-मुंब्रा ब्रिजबोगद्याजवळ, निर्जन ठिकाणी संशयितरित्या एक इसम मिळून आला…

Read More