Close Menu
    What's Hot

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    नवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!

    होळी स्नेह मिलन व समाज जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    Uncategorized

    गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करून अधिक कठोर करणार – मुख्यमंत्री…

    yuvasutra1@gmail.comBy yuvasutra1@gmail.comDecember 9, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    nagpur – गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता; कायद्यातील तरतुदींनुसार ‘हार्म आणि हर्ट’ या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

    विधानसभा सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख, अमीन पटेल यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात अवैध गुटखा, विक्री व वहन संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

    राज्यात गुटखा बंदी आहे.गुटखा विक्री व वहन संदर्भात राज्यभरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असून विविध जिल्ह्यांमध्ये एकूण शेकडो गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली आहे. यात नवी मुंबईत 1,144, अहिल्यानगर येथे 185, जालना 90, अकोला 35, नाशिक 131, चंद्रपूर 230, सोलापूर 108, बुलढाणा 664 तसेच नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत 1,706 गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

    शाळा किंवा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात गुटखा विक्रीचे प्रकार आढळल्यास त्या परिसरातील टपऱ्या किंवा दुकानांवर संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. त्याचबरोबर ही कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने केली जाणार आहे. तसेच ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी पुनर्वसन केंद्रांची आवश्यकता आहे. मुंबई महानगरमध्ये दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची कमतरता असून शासन यासंदर्भात आवश्यक पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleहिवाळी अधिवेशनात 75 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर…
    Next Article विधानसभेत नगर विकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या पुरवणी मागण्या मान्य…
    yuvasutra1@gmail.com
    • Website

    Related Posts

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    February 23, 2026

    कल्याण-डोंबिवलीत शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत; ६७४२ विद्यार्थ्यांचा सहभाग

    February 23, 2026

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमान अपघातात दुर्दैवी निधन

    January 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    नवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!

    होळी स्नेह मिलन व समाज जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

    केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बदलीची मागणी; मुख्यमंत्री यांना थेट निवेदन

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.