Author: yuvasutra1@gmail.com

navi mumbai – नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 मध्ये आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात प्रवेशाच्या तसेच मुख्य विविध 9 ठिकाणी दिवसाच्या तिन्ही सत्रांमध्ये 24 तासात 27 स्थिर संनिरीक्षण पथके (SST Team) स्थापन केलेली आहेत. या पथकांमार्फत वाहने व इतर बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, आचारसंहिता कक्षाचे मुख्य सनियंत्रण अधिकारी सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली, दि. 9 जानेवारी रोजी, दुपारी 12.30 वा. दरम्यान एपीएमसी मार्केट जवळील चेक पोस्टवर आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ.अमोल पालवे व परिवहन उपक्रमाचे मुख्य…

Read More

kalyan – देशी बनावटीचा गावठी कट्टा (अग्निशस्त्र) आणि २ जिवंत काडतुसासह एकास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. शफिक गफुर सैय्यद उर्फ बगला असे याचे नाव असून, त्याच्याकडून एकूण २ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बाजारपेठ पो. स्टे. गुन्हा नोंद क्र ६४/२०२४ भादंवि कलम ३९९,४०२ सह शस्त्र अधिनियम ४,२५(१) सह म.पो.का.क. ३७ (१), १३५ प्रमाणे गुन्हयातील पाहिजे आरोपी शफिक गफुर सैय्यद उर्फ बगला, हा दुर्गामाता मंदिराच्या मागील बाजूस लोखंडी ब्रिजच्या खाली कल्याण पश्चिम येथे देशी बनावटीचा गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) घेऊन कारमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून शफिक गफुर सैय्यद उर्फ बगला याला अटक केली…

Read More

mumbai – राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात १५ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर,…

Read More

kalyan – अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्यास कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली. करण जितु निशाद असे याचे नाव आहे. कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नेतीवली परिसरात एक इसम पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी नेतीवली कल्याण पूर्व परिसरात सापळा रचून जुने धान्य गोडावून जवळून करण जितु निशादला अटक केली. त्याच्याजवळ एक स्टील धातुचे पिस्टल मिळून आले. त्याची किंमत १ २५,०००/- रु. इतकी आहे. मिळलेले पिस्टल पोलिसांनी जप्त केले असून, सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गु.रजि नं. १२/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह म.पो.का. क३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरी. संदिप…

Read More

maharashtra – एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इम्तियाज जलील यांच्या गाडीवर नाराज कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगर मधील बायजीपुरा येथे पदयात्रा काढत असताना ही घटना घडली. एमआयएममधील अंतर्गत गटबाजी आणि उमेदवारी वाटपावरून जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली तीव्र नाराजी यातून समोर आली आहे. जलील यांच्याविरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून आदळ-आपट करण्याचाही प्रयत्न केला. पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने जुना गट नाराज असल्याचे समोर आले आहे. असरुद्दीन ओवेसी यांची सभा होणार असताना हा प्रकार घडल्याने शहरात तणाव वाढला आहे. दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना…

Read More

kalyan – कोर्टाने फरार घोषित केलेल्या दोन आरोपींना कल्याण क्राईम ब्रांच युनिट ३ पोलिसांनी अटक केली आहे. विनोद जगन्नाथ कांबळे आणि नागसेन उर्फ नागेश जगन्नाथ कांबळे अशी या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 411/2016 भा.द.वि. कलम 324, 34 या गुन्हयातील आरोपी विनोद जगन्नाथ कांबळे आणि नागसेन उर्फ नागेश जगन्नाथ कांबळे ते मिळून येत नव्हते. दरम्यान, या आरोपींना हजर होणे करीता न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग पहिले न्यायालय, कल्याण यांनी दि. 17/01/2023 रोजी जाहिरनामा काढलेला होता. त्यानुषंगाने पोलीस या दोन आरोपींचा शोध घेतला असता, हे दोघे काल्हेर भिवंडी येथे राहत असल्याची गुप्त माहिती पोशि गोरक्ष…

Read More

mumbai – राज्यात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी) 26 एप्रिल 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in आणि https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली. शासनमान्य शाळांमधून 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व सातवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र आणि शुल्क ऑनलाईन…

Read More

mumbai – राज्यभर प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात असून २ जानेवारी २०२६ रोजी ३१.६७ कोटी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यात प्रतिबंधित पदार्थांवर कठोर कारवाईचे आदेश दिले असून त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी आढावा घेतला. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथील ‘मे. सोएक्स इंडिया प्रा. लि.’ कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुन्यांमध्ये अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार ‘निकोटिन’ पॉझिटिव्ह आढळल्याने शासनाने १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाले आहे. हे उत्पादन मानवी आरोग्यास…

Read More

mumbai – बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला बिहार राज्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याने संयुक्तपणे केली आहे. या प्रकरणी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी जालना येथील सहायक मोटार वाहन निरीक्षक तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अभिजीत कडुबा बावस्कर यांनी फिर्याद दिली होती. अज्ञात आरोपींनी बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून शासकीय प्रक्रियेचा गैरवापर करीत आर्थिक लाभासाठी नागरिकांना बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. त्यावरून सायबर पोलीस ठाणे, जालना येथे गुन्हा…

Read More

dombivali – डोंबिवली पूर्वेतील हेदुटणे गावात अनिधकृत गाळे व रूम बांधण्यात आले असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या १०/ ई प्रभाग कार्यालयात वारंवार तक्रार अर्ज करून देण्यात आली असून, अजूनही या अनिधकृत गाळे व रूमवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत गंगाराम काळे यांनी वारंवार १०/ ई प्रभाग कार्यालयात तक्रार अर्ज दिला आहे. पण अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. हेदुटणे गाव मुख्य कमानीच्या थोड्या अंतरावर हे अनिधकृत गाळे व रूम बांधण्यात आले आहेत. आणि धक्कादायक बाब म्हणजे या अनधिकृत गाळ्यात शासकीय दवाखाना आहे. दरम्यान, यासंदर्भात आता १०/ ई प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांना निलंबित…

Read More