Close Menu
    What's Hot

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    नवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!

    होळी स्नेह मिलन व समाज जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

    Facebook X (Twitter) Instagram
    crimeaala.com
    • ताज्या बातम्या
    • देश-विदेश
    • महाराष्ट्र
    • शहर
      • Mumbai
      • Thane
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • लाईफस्टाईल
    • फोटो
    • व्हिडिओ
    Facebook X (Twitter) Instagram WhatsApp
    crimeaala.com
    Uncategorized

    बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक…

    yuvasutra1@gmail.comBy yuvasutra1@gmail.comDecember 29, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter Copy Link WhatsApp
    Share
    Facebook Twitter Email WhatsApp

    mumbai – बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला बिहार राज्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याने संयुक्तपणे केली आहे.

    या प्रकरणी दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी जालना येथील सहायक मोटार वाहन निरीक्षक तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अभिजीत कडुबा बावस्कर यांनी फिर्याद दिली होती. अज्ञात आरोपींनी बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून शासकीय प्रक्रियेचा गैरवापर करीत आर्थिक लाभासाठी नागरिकांना बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. त्यावरून सायबर पोलीस ठाणे, जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

    गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जालना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान आरोपी नामे बिड्डराज प्रमोद यादव हा आपले वास्तव्य वारंवार बदलत असल्याचे निष्पन्न झाले. अखेर दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी पटना, सिमरी बख्तियारपूर व सहरसा परिसरात शोध मोहीम राबवून त्याला ताब्यात घेण्यात आले.

    आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला लॅपटॉप, आयफोन, थंब मशीन असा सुमारे 1 लाख 46 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपीस 28 डिसेंबर 2025 रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    या गुन्ह्यात यापूर्वी जम्मू-काश्मीर येथील फैसल बशीर मीर आणि जालना येथील मुजाहिद उर्फ डॉन रईसोद्दीन अन्सारी यांना अटक करण्यात आली आहे.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक जालना, अपर पोलीस अधीक्षक तसेच सहरसा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली, असे परिवहन आयुक्त, मुंबई यांनी कळविले आहे.

    Follow on Google News Follow on Facebook Follow on WhatsApp
    Share. Facebook Twitter Copy Link Bluesky WhatsApp
    Previous Articleडोंबिवली : वारंवार तक्रार करूनही हेदुटणे गावातील अनिधकृत गाळे व रूमवर कारवाई नाही…
    Next Article ३१.६७ कोटींचा हुक्का साठा जप्त…
    yuvasutra1@gmail.com
    • Website

    Related Posts

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    February 23, 2026

    कल्याण-डोंबिवलीत शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत; ६७४२ विद्यार्थ्यांचा सहभाग

    February 23, 2026

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमान अपघातात दुर्दैवी निधन

    January 28, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Latest Posts

    ठाणे महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय!

    नवीन वडवली रोडवरील रेसिंगचा थरार अखेर तुरुंगात संपला!

    होळी स्नेह मिलन व समाज जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

    केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या बदलीची मागणी; मुख्यमंत्री यांना थेट निवेदन

    Latest Posts

    Subscribe to News

    Get the latest sports news from NewsSite about world, sports and politics.

    Facebook X (Twitter) Pinterest Vimeo WhatsApp TikTok Instagram

    News

    • World
    • US Politics
    • EU Politics
    • Business
    • Opinions
    • Connections
    • Science

    Company

    • Information
    • Advertising
    • Classified Ads
    • Contact Info
    • Do Not Sell Data
    • GDPR Policy
    • Media Kits

    Services

    • Subscriptions
    • Customer Support
    • Bulk Packages
    • Newsletters
    • Sponsored News
    • Work With Us

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Privacy Policy
    • Terms
    • Accessibility

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.