Author: crime aala

डोंबिवली: डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या चेन स्नॅचिंग टोळीचा विष्णुनगर पोलिसांनी पर्दाफाश करत अवघ्या काही दिवसांत गुन्ह्याची उकल केली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ६४ वर्षीय नागरिकाच्या डोक्यात काठीने वार करून गळ्यातील सोन्याची चेन लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सहा विधीसंघर्षीत बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. २४ मे रोजी पहाटे गावदेवी जेट्टी परिसरात फेरफटका मारत असलेल्या सुगंध मंगल्या म्हात्रे यांच्यावर दोन दुचाकीस्वारांनी हल्ला चढवला. डोक्यात काठीचा फटका मारून त्यांना खाली पाडल्यानंतर गळ्यातील सुमारे २६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून आरोपी फरार झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गुन्हा दाखल होताच विष्णुनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक…

Read More

कल्याण : कल्याण स्टेशन आणि लालचौकी परिसरात प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेशिस्त ऑटो रिक्षाचालकांविरोधात रविवारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली. या कारवाईमुळे दिवसभर स्टेशन परिसरात रिक्षाचालकांमध्ये एकच खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अक्षया बनसोडे, कविता पवार आणि प्रणव भुसे यांच्या विशेष पथकाने स्टेशन परिसरात थेट रस्त्यावर उतरून रिक्षांची तपासणी केली. जादा प्रवासी वाहतूक, अपूर्ण कागदपत्रे, नियमबाह्य वाहतूक आणि चालकांची माहिती यांची कसून चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे काही चालकांचे मराठी भाषेतील व्यवहारिक ज्ञानही तपासण्यात आले. या मोहिमेत एकूण १५ ऑटो रिक्षांची तपासणी करण्यात आली असून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई…

Read More

डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाणे आणि नवी मुंबई पोलीस यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी पहाटे खोणी-पलावा परिसरात मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवत अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या नायजेरियन नागरिकांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत १३ पुरुष, ७ महिला, ३ अल्पवयीन मुले आणि १ अल्पवयीन मुलगी अशा एकूण २४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कायदेशीर कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात ड्रग्सविरोधी कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर खोणी-पलावा परिसरात काही नायजेरियन नागरिक अवैधपणे राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचबरोबर नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील एका पाहिजे आरोपीचा…

Read More

कल्याण:कल्याण परिमंडळ-३ अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई करत तब्बल ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपयांचे ९ किलो ७६८ ग्रॅम “हेरॉईन (गर्द)” जप्त करण्यात आले असून मुख्य पुरवठादारासह पाच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. स्मशानभूमीजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेतल्यानंतर या आंतरजिल्हा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला. या कारवाईत कासिम अब्दुल सत्तार वसईकर, कृष्णा नागप्पा हळेमणी, अमजद युसुफ पठाण, गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा आणि सद्दाम गफुर शेख या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या “गर्द”ची किंमत तब्बल ३४ कोटींपेक्षा अधिक असल्याने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तपासादरम्यान मुख्य सूत्रधार अमजद पठाण याच्याकडून…

Read More

डोंबिवली : केडीएमसीकडे फेरीवाल्यांविरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून एका पत्रकाराला थेट “तुला बघून घेईल, लेडीज काय करू शकते हे दाखवते” अशी धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पोलीस ठाणे आवारातच घडली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार विनोद प्रेमनारायण गिरी यांनी केडीएमसीकडे फेरीवाल्यांविरोधात तक्रार केली होती. याचाच राग मनात धरून छाया अमोल खिल्लारे हिने १२ मे रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पोलीस ठाणे परिसरात गिरी यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 351(2) अंतर्गत डोंबिवली पोलीस ठाण्यात एनसीआर क्रमांक 1708/2026 दाखल…

Read More

चिपळूण:कोकणातील चिपळूण आणि खेड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि CNG चा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांचे अक्षरशः हाल होत आहेत. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे हजारो पर्यटक आणि प्रवासी बाहेर फिरण्यासाठी निघाले असतानाच अचानक निर्माण झालेल्या इंधन टंचाईने नागरिकांची मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. पेट्रोल पंपांबाहेर पहाटेपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. वाढत्या उकाड्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह अनेक प्रवासी तासनतास उन्हात उभे राहून इंधन मिळण्याची वाट पाहताना दिसले. काही ठिकाणी तर CNG संपल्याचे फलक लावण्यात आल्याने वाहनचालकांचा संताप अनावर झाला. विशेष म्हणजे, या टंचाईमागचे नेमके कारण काय याबाबत पेट्रोलियम कंपन्यांकडून कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.…

Read More

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या १०/ई प्रभाग कार्यालयातील कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, “या प्रभागात मनपाचे नियम लागू होतात की नाही?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. डोंबिवलीतील रहिवासी मनोज गिरी यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, याच प्रभागातील कर्मचारी शासकीय वेळेत पत्ते खेळत असल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली होती. मात्र त्यावर कारवाई झाल्याचे चित्र दिसत नाही. आज पुन्हा कामानिमित्त प्रभाग कार्यालयात गेल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. वार्ड ऑफिसरचा खाजगी वाहन चालक थेट अनधिकृत बांधकाम निवारण कक्षात बसलेला आढळून आला. विशेष म्हणजे या कक्षात महत्त्वाचे शासकीय कागदपत्रे, अर्जदारांची वैयक्तिक माहिती व संवेदनशील नोंदी ठेवण्यात येतात. अशा ठिकाणी…

Read More

बदलापूर (प्रतिनिधी): बदलापूर पाईप लाईन रोड वरील येथील नेवाळी नाका परिसरात आज सकाळी एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यात आडवा झाला. या अपघातामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून कामावर जाणाऱ्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र ट्रक हटविण्याचे काम सुरू असून वाहतूक काही काळ विस्कळीत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. .अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.

Read More

कल्याण:कल्याण शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ०४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ०७ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दि २८ एप्रिल २०२६ रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सम्राट अशोक चौक, कल्याण पश्चिम येथे सापळा रचण्यात आला. त्यावेळी चोरीस गेलेली होंडा अॅक्टिव्हा (MH-05/CR-1115) घेऊन उभ्या असलेल्या समर्थ नरसु पाटील (वय १९) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवत चौकशी…

Read More

डोंबिवली(प्रतिनिधी):सन २०१४ मध्ये अपहरण झालेल्या करण अरविंद बागुल (वय २३, रा. दावडी) या तरुणाच्या बेपत्ता प्रकरणाचा तब्बल १२ वर्षांनी थरारक उलगडा करण्यात कल्याण गुन्हे शाखा घटक-०३ ला यश आले आहे. अपहरण करून लोखंडी रॉडने निर्दयीपणे खून करत प्रेत घनदाट जंगलात फेकून पुरावे नष्ट करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तपासात उघड झाले की, जमीन व्यवहारातील आर्थिक वादातून मुख्य आरोपी सुरेंद्र पांडुरंग पाटील याने ४ ऑक्टोबर २०१४ रोजी करण बागुल याचे अपहरण करून दावडी येथील कार्यालयात नेले. तेथे लोखंडी रॉडने तोंड, डोके व कपाळावर सपासप वार करून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर साथीदार चंद्रकांत गायकर व सुरेश देगावत उर्फ छोटू यांच्या…

Read More