Author: yuvasutra1@gmail.com
nagpur – गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता; कायद्यातील तरतुदींनुसार ‘हार्म आणि हर्ट’ या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका लागू करता येईल, अशा आवश्यक दुरुस्त्या कायद्यात करण्यात येऊन हा कायदा अधिक कठोर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य आमदार प्रशांत ठाकूर, अस्लम शेख, अभिमन्यू पवार, रईस शेख, अमीन पटेल यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात अवैध गुटखा, विक्री व वहन संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्यात गुटखा बंदी आहे.गुटखा…
nagpur – विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आज पासून नागपुरात सुरू झाले असून, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुरवणी मागण्या सादर केल्या. अधिवेशनात एकूण रु. ७५,२८६.३८ कोटींच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर करण्यात आल्या आहेत. यापैकी रु. २७,१६७.४९ कोटींच्या अनिवार्य, रु.३८,०५९.२६ कोटींच्या कार्यक्रमांतर्गत व रु. १०,०५९.६३ कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. पुरवणी मागण्यांपैकी १५ हजार ६४८ कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राखीव आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी ६ हजार कोटींहून अधिक तर मनरेगासाठी…
nagpur – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आज पासून नागपुरात सुरू झाले असून, यात १८ विधेयके मांडली जाणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील मोठ्या राज्यांमध्ये सर्व निकषांत अग्रेसर असणारी अर्थव्यवस्था आहे. राज्यात पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या सुमारे ९२ टक्के म्हणजेच ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. केवायसी (KYC) प्रक्रियेमुळे राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत…
mumbra – अंमली पदार्थ विक्री करणा-या गुन्हेगारास मुंब्रा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून २ किलो (किंमत एक करोड दहा लाख पंचवीस हजार) चरस जप्त केला आहे. मोहम्मद हारून हसरत अली सिद्धीकी असे याचे नाव आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाची विक्री व सेवन करण्याचे प्रमाण वाढले असून, त्या अनुषंगाने वरिष्ठ. पो.निरी. अनिल शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे एन.डी.पी.एस पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अंमली पदार्थ विक्री व सेवन करणा-या इसमांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने पोलीस पथक मुंब्रा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना कौसा काळसेकर परिसरातील, ऐरोली-मुंब्रा ब्रिजबोगद्याजवळ, निर्जन ठिकाणी संशयितरित्या एक इसम मिळून आला…
thane – भिवंडीत हातभट्टी दारूचा साठा जप्त करून एकास अटक करण्यात आली आहे. भिवंडी गुन्हे शाखा, घटक २ च्या पोलिसांनी कारवाई केली असून, यात पोलिसांनी १ लाख रुपयांची, १,११५ लिटर हातभट्टीची तयार दारू जप्त केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रुपेश पाटील असे आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अलीमघर परिसरात राहणाऱ्या रुपेश पाटीलच्या राहत्या घराशेजारील खोलीमध्ये छापा टाकला आणि एकूण १ लाख ११ हजार ५०० रुपये किंमतीची १,११५ लिटर हातभट्टीची तयार दारू जप्त केली. तसेच सदर प्रकरणी नारपोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ।१३०७/२०२५, दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदरची यशस्वी कामगिरी अमरसिंह जाधव,…
mumbai – राज्यातील महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. डिजिटल 7/12 उताऱ्याला अखेर राज्य सरकारने कायदेशीर मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश काढत डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उतारे आता पूर्णपणे वैध मानण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी राज्य सरकारने अधिकृत परिपत्रकही जारी केले आहे. या निर्णयामुळे:
mumbai – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ ते रविवार १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे. १३ डिसेंबर शनिवार आणि १४ डिसेंबर रविवार शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.…
nagpur – राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. यासोबतच २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता कायम राहिल, असेही कोर्टाने स्पष्ट केले असून तोपर्यंत एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यासही बंदी असणार आहे. काही नगरपरिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास २० नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक २० डिसेंबरला होणार होती. त्यामुळे सर्व निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा २० नगरपरिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल…
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.