Author: yuvasutra1@gmail.com

new delhi – वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने(2025) सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी छत्रपती संभाजी नगर येथील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले. महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील 20 बालकांना २०२५ या वर्षासाठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले.शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या बालकांना गौरविण्यात आले. यापैकी दोघांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारार्थीमध्ये मध्ये ९ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे. यावेळी केंद्रीय महिला…

Read More

kalyan – ओडिशातून गांजाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करून महाराष्ट्रातील विविध शहरांत विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय अंमली पदार्थ तस्करी टोळीविरोधात ठाणे पोलिस आयुक्तालयाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत दुसरी कारवाई केली आहे. या प्रकरणात एकूण १४ आरोपींवर मकोका लावण्यात आला असून, १६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे महात्मा फुले चौक पोलीस ठाणे व कल्याण वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकाने कल्याण रेल्वे स्थानक परिसरात छापा टाकून छत्तीसगड नोंदणीच्या कार मधून गांजा विक्रीसाठी आलेल्या कार मधील एकाला अटक केली तसेच कार मधून ३५ किलो ४०० ग्रॅम गांजा, गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली. दरम्यान, या…

Read More

mumbai – क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून, सदर राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वीकारला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक विकास आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने सुनावलेली दोन वर्ष कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने बुधवारी कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. त्यानंतर कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. अखेर कोकाटे यांनी राजीनामा दिला असून, तो पक्षप्रमुख अजित पवार यांनी स्वीकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला आहे. अजित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्या पोस्टद्वारे अजित पवार यांनी राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली. आता देवेंद्र…

Read More

mumbai – राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मकोका लावण्यासाठीच्या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करण्यात येणार आहेत. त्यानंतर येत्या नवीन वर्षात गुटखा उत्पादकांवर मकोका लागणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. यापूर्वी गुटखा उत्पादक व विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव विधि व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र कायद्यातील तरतुदींनुसार “हार्म आणि हर्ट” या दोन्ही घटकांअभावी तो लागू होत नाही. त्यामुळे या कायद्यात बदल करण्यात येऊन गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवरही मकोका…

Read More

thane – जिल्ह्यात बालविवाहाची सामाजिक कुप्रथा पूर्णतः मोडीत काढण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांनी दिला आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार मुलीचे वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह करणे हा दखलपात्र गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये कोणालाही सूट दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. बालविवाहाच्या प्रकरणांमध्ये संबंधित पालक, मध्यस्थ, विवाह सभागृहाचे मालक, धर्मगुरू, विवाह लावणाऱ्या व्यक्ती तसेच बालविवाहास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दोषींना कारावास व दंडाची तरतूद कायद्यात असून कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण,…

Read More

mumbai – निवडणुक आयोगाने राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यात घेण्यात येणार असून 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली. राज्यातील 2869 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 1442 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. आज पासून 29 महानगरपालिका निवडणुकीसाठी आचार संहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम… नामनिर्देशन पत्र स्विकारण्याचा कालावधी: 23 – 30 डिसेंबर 2025नामनिर्देशन पत्रांची छाननी : 31 डिसेंबर 2025उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : 2 जानेवारी 2026निवडणूक चिन्ह वाटप : 3 जानेवारी 2026अंतिम उमेदवाराची यादी : 3…

Read More

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभागाची कारवाई… kalyan – कल्याण पश्चिमेत गांजा या अंमली पदार्थासह ओडीसा राज्यातील दोघांना अटक करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभागाने हि धडक कारवाई केली असून, या कारवाईत एकूण २२.२७१ किलो गांजा (किंमत ४,४५,४२०/- रुपये) जप्त करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेतील बैल बाजार वैकुंठ धाम स्मशान भूमी समोर पोलिसांना दोन जण संशयास्पदरित्या आढळून आले. झडती घेतली असता त्यांच्याजवळ एकूण २२.२७१ किलो गांजा (किंमत ४,४५,४२०/- रुपये) गांजा मिळून आला. तसेच गिरोधारी देव्हारी आणि ईशम्भूशाहू साहू अशी त्या दोघांनी नावे सांगितली. सदर प्रकरणी गांजा जप्त करण्यात आला असून, या दोघांविरुद्ध महात्मा फुले…

Read More

nagpur – मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे केली. भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साधारणत १९ हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात. १९६० पूर्वीच्या या इमारती आहेत. त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झाला आहे. काही इमारती जीर्ण होऊन पडल्या आहेत. तर, जवळपास १३ हजारांपेक्षा जास्त इमारती पुनर्विकासाच्या प्रतिक्षेत आहेत. या इमारतीतल्या भाडेकरुंना हक्क महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टनुसार संरक्षण प्राप्त आहे. या इमारती तसेच त्यातील भाडेकरु व करारनामे कायदेशीर आहेत. शासनाने…

Read More

thane – तरुण पिढीमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या वापरावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर (N-CORD) समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या सूचनांनुसार विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी आज निवासी जिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलीस आयुक्त कार्यालय, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, ऑद्यौगिक सुरक्षा कार्यालय, कल्यण, ठाणे, जिल्हा आरोग्य कार्यालय, ठाणे, जिल्हा शिक्षण विभाग, ठाणे (प्राथमिक व माध्यमिक), शिक्षण अधिकारी, ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर व कल्याण महानगरपालिका, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, ठाणे, जिल्हा कृषि अधिक्षक, ठाणे, उपवन…

Read More

nagpur – विधानसभेत नगरविकास, पाणी पुरवठा व गृहनिर्माण विभागाच्या सन 2025-26 च्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत पुरवणी मागण्या मांडल्या. विधानसभेत नगरविकास विभागाच्या सन 2025-26 या वर्षाच्या एकूण 9 हजार 195 कोटी 76 लाख 58 हजार रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या 196 कोटी 57 लाख 17 हजार रुपयांच्या मागण्याना मंजुरी देण्यात आली. गृहनिर्माण विभागाच्या 91.9 कोटींच्या मागण्या यावेळी मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्याच्या चर्चेत विधानसभेतील विविध सदस्य सहभागी झाले होते.

Read More